युवा नेते उत्तम पाटील : अरिहंत संस्थेतर्फे सत्कार
निपाणी (वार्ता) : सहकाररत्न रावसाहेब पाटील यांचा आशीर्वाद व अरिहंत उद्योग समूहाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांच्या विशेष सहकार्यामुळे सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावली. त्यामुळे कर्नाटक सरकारकडून दिला जाणाऱ्या सहकार रत्नपुरस्कार मिळाला. हा पुरस्कार केवळ माझा नसून सर्वांचाच असल्याचे मत सहकाररत्न, युवा नेते उत्तम पाटील यांनी व्यक्त केले. बोरगाव येथील अरिहंत को -ऑप. क्रेडिट सोसायटी मल्टीस्टेटतर्फे उत्तम पाटील यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक रावसाहेब पाटील उपस्थित होते.
संस्थेचे उपाध्यक्ष सतीश पाटील यांनी, उत्तम पाटील हे अत्यंत कमी वयात सहकाररत्न पुरस्कार मिळविल्याची बाब अभिमानास्पद आहे. सहकार क्षेत्रात काम करीत असताना नेहमीच सभासद शेतकऱ्यांचे हित जोपासण्याचे कार्य केले आहे. बँक, कृषी पत्तीन संघ, दूध संघ, स्पिनिंग मिल, साखर कारखाना, शाळा, दवाखाना या सर्व क्षेत्रात आदर्श असे काम केल्याने ते पुरस्कारासाठी प्राप्त ठरल्याचे सांगितले.
संस्थेच्या वतीने उत्तम पाटील व बोरगाव शिक्षणसंघाच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या राजेंद्र पाटील यांचा सत्कार युवा उद्योजक अभिनंदन पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी संचालक अभयकुमार करोले, पिरागोंडा पाटील, शरदकुमार लडगे, भुजगोंडा पाटील, बाशुद्दीन अफराज, राजू मगदूम, संदीप पाटील, शिवानंद राजमाने, जनरल मॅनेजर अशोक बंकापुरे, सहाय्यक व्यवस्थापक शांतिनाथ तेरदाळे, अभिनंदन बेनाडे, अभय खोत, कृषी संघाचे सीईओ आर. टी. चौगुला, प्रकाश जंगटे यांच्यासह संचालक व कर्मचारी उपस्थित होते. सहाय्यक व्यवस्थापक राजेंद्र बन्ने यांनी आभार मानले.