निपाणी (वार्ता) : भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त येथे विविध दलित संघटनेच्या वतीने अभिवादन करण्यात आले. त्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते
येथील बेळगाव नाका जुना पी. बी. रोडवरील क्रांती स्तंभापासून कॅण्डल मार्च रॅली काढली. नगरपालिका आवारातील डॉ.आंबेडकर पुतळ्यापर्यंत कॅण्डल रॅली काढून रॅलीची सांगता करण्यात आली.
मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्रिशरण पंचशील घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
कार्यक्रमास माजी आमदार काकासाहेब पाटील, सुशांत खराडे, अवधूत गुरव, रोहित यादव, रवी श्रीखंडे, जीवन घस्ते, जरारखान पठाण, अशोक लाखे, गजेंद्र पोळ. किसन दावणे, प्रशांत मधाळे, प्रा. शरद कांबळे, प्रमोद कांबळे, सुनील शेवाळे, प्रवीण माने, संदीप माने, कपिल कांबळे, महेश धम्मरक्षीत, सुधाकर माने, विकास मेस्त्री, कैलास ढाले, संतोष कांबळे, गोरखनाथ मधाळे, अमर शिंगे, भीमा कुरवे, कुमार कांबळे, जितू कांबळे, संजय कांबळे, पोपट घस्ते यांच्यासह विविध दलित संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta