आठवडाभर विविध कार्यक्रम : देशभरातील साधुसंतांची उपस्थिती
निपाणी (वार्ता) : निपाणी तालुक्यातील आडी येथील संजीवनगिरी डोंगरावरील श्रीदत्त देवस्थान मठात श्रीदत्त जयंतीनिमित्त सोमवार (ता. १८) ते मंगळवार (ता. २६) अखेर परमाब्धि विचार महोत्सव होणार आहे. आहे. त्यानिमित्त आठवडाभर प्रवचन, कीर्तनासह विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. या काळात देशभरातील साधुसंतांची उपस्थिती लाभणार आहे.
सोमवारी (ता. १८) सकाळी कलश, वीणा पूजनाने महोत्सवास प्रारंभ होणार आहे. दररोज सकाळी सुप्रभात गीतगायन, नित्य आरती, जप, दुपारी १२ वाजता नित्यारती व महाप्रसाद, दुपारी ३ वाजता मंदिरात तर सायंकाळी ५ वाजता सर्वेज्य सांस्कृतिक भवनात भजन संध्या कार्यक्रम होणार आहे. पहिले तीन दिवस सकाळी ७.३० ते दुपारी १२ परमाब्धि ग्रंथ पारायणाचे आयोजन केले आहे. गुरुवार पासून (ता. २१) पाच दिवस सकाळी ७.३० पासून श्री गुरुचरित्र पारायण, महोत्सवात आठ दिवस दररोज सायंकाळी ७.३० वाजता आणि दत्त जयंती दिवशी सायंकाळी जन्मोत्सवानंतर परमात्मराज महाराजांचे प्रवचन होणार आहे. त्यानंतर मान्यवरांचा सत्कार, महाप्रसाद व महाप्रसादाचे वाटप होणार आहे.
परमात्मराज महाराज यांच्या प्रवचनातून परमाब्धि ग्रंथातील विचारांचेचिंतन करण्यासाठी प्रेरणा मिळेल. सर्वजनहितासाठी महोत्सव उपयुक्त ठरेल.
महोत्सव भागातील यशस्वीतेसाठी प्रत्येक गावातील भाविकासह स्वयंसेवकांकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
सोमवारी (ता. २५) सकाळी दत्तगुरुचरणी अभिषेक अर्पण, महापूजा, महाआरती होईल. त्यानंतर गुरुचरित्र पारायण विविध ग्रंथाचे पठण होणार आहे. दुपारी आंबील घागरींची मिरवणुक काढली जाणार आहे.
दुपारी ३ पासून दर्याचे वडगाव येथील धोंडीराम मगदूम महाराजांचे यांचे दत्त जन्माख्यानावर कीर्तन होणार आहे. सायंकाळी ५ वाजता श्री दत्त जन्मोत्सव सोहळा पार पडणार आहे. नंतर महाप्रसादाने सोहळ्याची सांगता होणार आहे.