निपाणी (वार्ता) : येथील सटवाई रोडवरील सटवाई मंदिरामध्ये कार्तिक दीपोत्सव साजरा झाला. श्रीमंत दादाराजे देसाई -निपाणकर सरकार यांच्या हस्ते देवीसह समईचे पूजन करून दीपप्रज्वलन झाले. त्यानंतर भक्तांनी मंदिर परिसरामध्ये असलेल्या पणत्या लावून सटवाई मंदिर परिसर उजळून टाकला. यावेळी दादाराजे देसाई यांचा अजित जाधव यांच्या हस्ते सत्कार झाला. महाआरती झाल्यानंतर प्रसादाचे वाटप करण्यात आले.
यावेळी सुभाष कुकडे, दीपक जाधव, अजित जाधव, सुभाष कुकडे, दीपक बगाडे, उमेश सौंदलेकर, केतन सावंत, संजय चव्हाण, दृश्यता माने, तुषार माने, संजय चव्हाण, अमोल कुंभार, प्रकाश जाधव, आदित्य जाधव, निखिल बगाडे यांच्यासह महिला उपस्थित होत्या.