निपाणी (वार्ता) : अक्कोळ येथील सव्वा दोन वर्षे वय असलेल्या प्रीतम दळवी या चिमुकल्याचे आपल्या अलौकिक बुद्धिमत्तेने (इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये) नोंद झाल्याने परिसरातून त्याचे कौतुक होत आहे.
प्रीतम हा अकरा महिन्याचा असतानाच एखाद्या वस्तूचे निरीक्षण केल्यास किंवा ऐकल्यास पुरेसे आहे. या सर्व गोष्टी केव्हाही विचारल्यास पटापट त्यांची माहिती सांगतो. त्याची बुद्धिमत्ता ओळखून त्यांच्या आई-वडिलांनी मोबाईलपासून दूर ठेवून पुस्तकांच्याकडे गुंतवून तो एक अभ्यास नसून खेळ आहे, असे अनेक विषय त्याला सांगितले. त्यानुसार त्याच्या बुद्धी चतुर्याचे कौशल्य पाहून आई-वडिलांना आनंद झाला. यापुढेही संपूर्ण त्याचे वय पाहिले तर अजून आईच्या कुशीत खेळण्या बागडण्याच्या वयात त्याच्या आई-वडिलांना बुद्धिमत्तेचे आश्चर्य वाटले. आपल्या अलौकिक बुद्धिमत्तेने विचारलेल्या प्रश्नांना पटापट उत्तरे तो देतो.
प्रीतमने आतापर्यत भारतीय स्वातंत्र्य चळवळ, येथील नेत्यांची नावे,पंधरा योगाची प्रात्यक्षिके, नऊ भारतीय मंदिरे, दहा जलचर प्राण्यांची नावे, दहा वाहतुकीचे नियमांची चिन्हे, ११ जंगली प्राण्यांची नावे, १० पाळीव प्राण्यांची नावे, १२ मानवी शरीराचे भाग, १२ फळांची नावे,१२ पालेभाज्या, १२ वाहनांची नावे, ७ जागतिक आश्चर्ये, १० अंक, ९ राष्ट्रीय चिन्हे, ९ विविध देशांचे ध्वज, १० कीटकांची नावे हे सर्व विचारताच पटकन ओळखतो. सव्वादोन वर्षात मिळालेले यश कौतुकास्पद आहे.
या मुलाच्या आई वडिलांनी मोबाईलद्वारे ऑनलाईन अर्ज भरला होता. दिल्ली येथे इंडिया बुक नोंद करण्यात आले. त्यानंतर एक महिन्यानंतर या मुलाशी ऑनलाइन व्हिडिओद्वारे त्याची संपूर्ण माहिती घेण्यात आली. त्याची दखल घेऊन ऑनलाईन त्याला मिळालेले पारितोषिक घरपोच करण्यात आले.