निपाणी (वार्ता) : अर्जुननगर (ता. कागल) येथील देवचंद महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा तब्बल २६ वर्षानंतर दोन दिवसांचा स्नेहमेळावा दांडेली येथे पार पडला. यावेळी आजी माजी प्राचार्य, प्राध्यापक उपस्थित होते.
संगीता पाटील यांनी प्रास्ताविक केले. माजी प्राचार्य डॉ. एम. जे. कशाळीकर यांनी, प्रत्येकांनी महाविद्यालयीन काळातील शिस्त जीवनातही पाळली पाहिजे. समाज, शाळा आणि मातीचे ऋण फेडण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन केले. प्राचार्य जी. डी. इंगळे, डॉ. आर. के. दिवाकर, डॉ. श्रीधर गोखले, रूपाली गदगे यांनीही माजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास प्रा. आर. वाय. चिकोडी, प्रा. व्ही. बी. घाटगे, संजय माने, अंद्रेश सुतार, आशाराणी जाधव, संजय डावरे, सुनील भोपळे, प्रशांत घोडके, रवी येजरे, संजय लाखे, प्रभाकर बोधले, प्रमिला जाधव, सुनीता, रुषाली चिऊलकर, सुनिता ठाकूर, अनिता चिकोर्डे, सुरेखा चव्हाण, राम कदम, प्रदीप पुरवंत, विजयकुमार सावंत, नंदकुमार मोहिते यांच्यासह माजी विद्यार्थी उपस्थित होते. राजू खराडे यांनी आभार मानले.