निपाणी (वार्ता) : श्री बाहुबली विद्यापीठ संचालित, पी. बी. आश्रम स्तवनिधी मधील अरुण शामराव पाटील हायस्कूल येथे दहावी विद्यार्थ्यांसाठी गणित विशेष मार्गदर्शन शिबिर झाले. श्रीक्षेत्र धर्मस्थळ ग्रामीण अभिवृद्धी योजना ट्रस्टच्या डॉ. वीरेंद्र हेगडे ज्ञान विकास संस्थेतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक महावीर पाटील होते.
एस. एस. तेरदाळ यांनी प्रास्ताविक केले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले.
तालुका योजना अधिकारी जाफर अत्तार, रामदासगौडा, सेवा गव्हाण सेवा प्रतिनिधी दीपा मुरगरे, बीआरपी प्रवीण कागे, डी. डी. शिंदे यांचा सत्कार झाला.
जाफर अत्तार यांनी, धर्मस्थळाचे समाजातील योगदान, महिला स्व -सहाय्य संघटनेत योगदान, शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाची माहिती सांगितली. प्रवीण कागे यांनी विद्यार्थ्यांना दहावी परीक्षेबाबत ची माहिती दिली.
संचालक महावीर पाटील यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. राकेश तावदारे, मुख्याध्यापक बी.बी. दादन्नावर,एस. एस. तेरदाळ, जमीर बागबान यांच्यासह शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते. जे. डी. कोरडे यांनी सूत्रसंचालन केले. एन. डी. तेलगड्डी यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta