
कुर्ली हायस्कूलमध्ये ‘उमंग’ कार्यक्रम
निपाणी (वार्ता) : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना संधी देण्यासाठी शाळा विविध उपक्रम राबवितात. त्यामुळे विद्यार्थ्यांचाआत्मविश्वास वाढतो. बौद्धिक विकासा बरोबर त्यांच्या कला, गुणांना संधी मिळते. शालेय स्तरांवर सांस्कृतिक कार्यक्रमामधून सामाजिक प्रबोधन केल्यामुळे भारतीय संस्कृतीचे संवर्धन होत असल्याचे, मत बोरगाव येथील सहकाररत्न उत्तम पाटील यांनी व्यक्त केले.
कुर्ली येथील सिद्धेश्वर विद्यालयात आयोजित ‘उमंग’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी स्कूल बेटरमेंट कमिटी सदस्य अरुण निकाडे होते.
मुख्याध्यापक एस. एस. चौगुले प्रास्ताविक केले. मान्यवरांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. उत्तम पाटील यांच्या हस्ते दिप प्रज्वलन झाले.
सहकाररत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल उत्तम पाटील यांचा ग्रामस्थांतर्फे सत्कार करण्यात आला. राज्य स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रणाली पाटील व सांस्कृतिक कार्यक्रम कोरिओग्राफर महादेव खिरुगडे यांनाही गौरविण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्ती, भारुड, गोंधळ, धनगरी गीत, विविध अभिनय व नाटिकांचे सादरीकरण केले. त्याला प्रेक्षकांनी दाद दिली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एम. बी. खिरुगडे, एस. ए. पाटील, यु. पी. पाटील, के. ए. नाईक, ए. व्ही. पाटील, एस. एस. वाळके, एस. एस. साळवी, ए. ए. चौगुले यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमास माजी मुख्याध्यापक बी. एस. पाटील, माजी ग्राम पंचायत अध्यक्ष श्रीनिवास पाटील, विश्वनाथ पाटील, शिवाजी चौगुले, ममदापुर ग्रामपंचायत उपाध्यक्ष गजानन कावडकर, सीताराम चौगुले, आनंदा ढगे, डी. एस. चौगुले, नवनाथ पाटील, बी. एस. हेरवाडे, अशोक माने, धीरज पाटील, अंजली अमृतसमन्नावर यांच्यासह परिसरातील विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते. एस. ए. पाटील यानी सूत्रसंचालन केले. टी. एम. यादव यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta