Sunday , July 26 2026
Breaking News

आदर्श मल्टीपर्पज को- ऑप. सोसायटीच्या निवडणुकीत सत्ताधारी गटाचा विजय

Spread the love

 

बेळगाव : सहकार क्षेत्रातील विश्वासार्ह संस्था म्हणून नावाजलेल्या अनगोळ रोड येथील दि. आदर्श मल्टीपर्पज को- ऑप. सोसायटीच्या रविवारी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी गटाने सर्वच्या सर्व पंधराही जागा जिंकून प्रचंड विजय मिळवला.
सामान्य गटाच्या नऊ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत आप्पासाहेब लक्ष्मण गुरव 606, अमरनाथ कृष्णा फगरे 530, अवधूत मुकुंद परब 523, ईश्वर यल्लोजीराव मेलगे 415, दिगंबर मारुती राऊळ 592, नेमिनाथ यल्लाप्पा कंग्राळकर 507, फतेसिंह प्रतापराव मुचंडी 357, लक्ष्मण महादेव शानभाग 434, सातप्पा महादेव जाधव 410 हे विजयी झाले. तर महिला गटातून सौ. ए. ए. साळवी व सौ. अर्चना एन. पाटील, ओबीसी गटातून एन. आर. सनदी, ए. सी. रोकडे व एससी/एसटी गटातून आर. टी. पवार व पी. एस. साळुंखे यांची याआधीच बिनविरोध निवड झाली आहे.
या निवडणुकीत एकूण 1511 मतदरांपैकी 767 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. निवडणूक निकालानंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करून जल्लोष केला.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *