Saturday , October 19 2024
Breaking News

स्तवनिधीला पर्यटन स्थळाचा दर्जा मिळेल

Spread the love

 

खासदार अण्णासाहेब जोल्ले; १००८ जिनमंदिराचा पायाभरणी

निपाणी (वार्ता) : स्तवनिधी येथील पार्श्वनाथ ब्रह्मचर्यश्रम, श्री आडी मल्लिकार्जुन देवस्थान आणि श्रीक्षेत्र हालसिद्धनाथ ही मंदिरे आपल्या भागातील आहेत. तेथे भक्तांची संख्या वाढत आहे. ही बाब लक्षात घेऊन वरील परिसरांचा विकास करण्याचा आपला मानस आहे. पार्श्वनाथ भगवान ब्रह्मचारी आश्रमामध्ये अनेक सुविधा दिल्या जात आहेत. भविष्यात या स्थळाला पर्यटन स्थळाचा दर्जा देण्यासाठी आपण प्रयत्नशील असून त्याचा आराखडा तयार असल्याचे खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी सांगितले. स्तवनिधी येथील नूतन श्री १००८ जिनमंदिराचा सोमवारी (ता.२५) पायाभरणी करून आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी १०८ सहजसागर महाराज, अरुण सागर महाराज सुबाहू सागर महाराज, सौधर्म सागर, महाराज, अध्यात्मसागर महाराज, शाश्वतसागर महाराज यांच्यासह आर्यीकांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी संस्थेचे संचालक महावीर पाटील यांनी, मंदिर बांधकामाचा आढावा घेऊन या कामासाठी अडीच कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यासाठी समाजातील देणगीदारांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
बाहुबली ब्रह्मचार्याश्रमाचे सेक्रेटरी डी. सी. पाटील यांनी, संसार करताना धर्म साधने महत्त्वाचे आहे. त्यासाठी प्रत्येकाने आयुष्यात दानधर्म करण्याचे आवाहन केले. सुपर सुपार्श्वसागर महाराजांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांचा श्री क्षेत्र पार्श्वनाथ ब्रह्मचर्याश्रम तर्फे सत्कार करण्यात आला. अनिल कलाजे व धीरज व राजू पंडित यांनी पौरोहित्य केले. विधानाचार्य राजेंद्र चौगुले, धीरज पाटील यांनी विधान कार्य केले.
कार्यक्रमास माणिक हन्नमणावर, धनंजय दिघे, जिनरत्न रोटे, धर्मेश टी, प्रशांत चौगुले, राजू पाटील, प्रदीप पाटील, विनोद देशमाने, डॉ. संतोष चौगुले, गोमटेश बेडगे, कलाप्पा कागवाडे, सुनील बल्लोळ, बी. बी. बेडकीहाळे, आर. पी.पाटी, तनम मिरजे, अर्चना पाटील, स्वयंप्रभा पाटील, पांचाली कळंत्रे यांच्यासह श्रावक-श्राविका व गुरुकुल संस्थेच्या अक्कोळ, सिदनाळ येथील शिक्षक, कर्मचारी देणगीदार, विद्यार्थी उपस्थित होते. आर. जे. खोत यांनी सूत्रसंचालन केले. एम. बी. कोल्हापूरे यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

निपाणीत उरुसाला प्रारंभ

Spread the love  धार्मिक कार्यक्रमासह शर्यती : कुस्ती मैदानाचेही आयोजन निपाणी (वार्ता) : येथील संत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *