Monday , September 21 2026
Breaking News

महिलेशी असभ्य वर्तन केल्याप्रकरणी संकेश्वर पोलिस स्टेशनचे पीएसआय निलंबित

Spread the love

 

बेळगाव : तक्रार देण्यासाठी आलेल्या महिलेशी गैरवर्तन केल्याप्रकरणी बेळगाव जिल्ह्यातील संकेश्वर पोलीस स्टेशन पीएसआयला निलंबित करण्यात आले आहे.

संकेश्वर पोलीस स्टेशनचे पीएसआय नरसिंहराजू जे. डी यांना निलंबित करण्यात आले आहे. बेळगाव जिल्हा पोलिस प्रमुख यांच्या आदेशानुसार नरसिंहराजू यांना कर्तव्यात कसूर, अनुशासनहीनता आणि गैरवर्तणूक केल्याबद्दल निलंबित करण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वी एक महिला आपल्या पतीविरोधात तक्रार देण्यासाठी संकेश्वर पोलीस स्टेशनमध्ये आली होती. यावेळी पीएसआय नरसिंह राजू यांनी महिलेशी गैरवर्तन तर करत होतेच शिवाय तिचा मोबाईल क्रमांक मिळवून तिला त्रास देत होता. यामुळे संतप्त झालेल्या महिलेने जिल्हा पोलिस प्रमुखांकडे तक्रार केली. त्यानुसार पीएसआय नरसिंह राजू यांना निलंबित करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *