
उपाध्यक्षपदी नवाळे, सचिवपदी खोत यांची निवड
निपाणी (वार्ता) : तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी मधुकर पाटील यांची तर उपाध्यक्षपदी अनिल नवाळे व सेक्रेटरीपदी सोमनाथ खोत यांची एकमताने निवड करण्यात आली. शनिवारी तालुका पत्रकार संघाचा कार्यक्रम जवाहरलाल तलाव येथील फिल्टर हाऊस परिसरात झाला. यावेळी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष अमर गुरव, उपाध्यक्ष अजित कांबळे, सेक्रेटरी अश्विन अमणगी यांच्यासह कोअर कमिटीचे सदस्य राजेश शेडगे, विठ्ठल केसरकर, गौतम जाधव उपस्थित होते.
प्रारंभी स्वागत पांडुरंग मधाळे यांनी केले. यावेळी सन 2024-25 या सालासाठी संघाच्या अध्यक्षपदी मधुकर पाटील, उपाध्यक्षपदी अनिल नवाळे तर सेक्रेटरीपदी सोमनाथ खोत यांची बिनविरोध निवड झाल्याचे कोर कमिटीने घोषित केले. यावेळी नूतन व मावळत्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना नूतन अध्यक्ष पाटील म्हणाले, तालुका पत्रकार संघाच्या वतीने वर्षभरात विविध उपक्रम राबवले जातात. या संघाची अधिकृत नोंदणी झाली असून नुकतेच या संघासाठी नगरपालिकेच्या वतीने स्वतंत्ररित्या कार्यालयासाठी स्वतंत्र जागेचे हस्तांतर होणार आहे. या कामाच्या पूतर्तीसाठी आपल्याला संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे सहकार्य आवश्यक आहे. या पुढील काळात संघाच्या विविध उपक्रमासाठी आपला सक्रिय सहभाग राहील असे सांगितले. यावेळी भानुदास कोंडेकर, गजानन रामनकट्टी, सुनील गिरी, विजय बुरुड, संभाजी माने, महांतेश पाटील, उत्तम सूर्यवंशी, सुनील तराळ, दादासाहेब जनवाडे, किरण पाटील, उत्तम माने, सुयोग किल्लेदार, शिवाजी भोरे, प्रशांत कांबळे, शितल चौगुले, प्रसाद इनामदार, राजकुमार बन्ने, मोहन बन्ने, राहुल पाटील, मोहन बन्ने, हेमंत पाटील, नंदकुमार चेंडके, श्रीकांत कुंभार, आप्पासाहेब दिंडे, तानाजी बिरनाळे, शिवाजी येडवान यांच्यासह पत्रकार संघाचे सदस्य उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta