डॉ. सी. बी. कुरबेट्टी; ‘महात्मा बसवेश्वर’ची त्रैमासिक सभा
निपाणी (वार्ता) : संस्थेची प्रगती ही तेथील व्यवस्थापनावर अवलंबून असते. व्यवस्थापनाने घेतलेले बरे-वाईट निर्णय संस्थेच्या प्रगतीसाठी दिशादर्शक ठरतात, असे मत येथील महात्मा बसवेश्वर सौहार्द संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सी. बी. कुरबेट्टी यांनी व्यक्त केले.
येथील गांधी चौक येथील व्यंकटेश मंदिरात झालेल्या त्रैमासिक सभेत ते बोलत होते. यावेळी श्री विरूपाक्ष लिंग समाधी मठाच्या प्राणलिंग स्वामींची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. कुरबेट्टी म्हणाले, आम्ही सर्व संचालकांच्या सहकार्याने लवकरच ७०० कोटींच्या ठेवीकडे वाटचाल करत आहोत. सभासद, ठेवीदार, कर्जदारांनी सहकार्य केले आहे. संस्थेच्या कर्मचा-यांनीही प्रामाणिकपणे कार्य केले आहे. ग्राहकांच्या सोयीसाठी अनेक कार्यप्रणालींची सुरवात केली आहे. याशिवाय कर्मचारी सभासदासाठी विशेष आरोग्य शिबिरे घेतली जात आहेत. मोबाईल बँकिंग साठी थ्री स्टार सॉफ्टवेअर घेतल्याने कमी वेळेत अचूक माहिती होत असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रारंभी श्री प्राणलिंग स्वामी यांच्या हस्ते बसव मूर्तीचे व दिपप्रज्वलन झाले.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष सुरेश शेट्टी, संचालक डॉ. एस. आर. पाटील, किशोर बाली, प्रताप पट्टणशेट्टी, श्रीकांत परमणे, महेश बागेवाडी, अशोक लिगाडे, सदानंद दुमाले, प्रताप मेत्राणी, पुष्पा कुरबेट्टी, विजया शेट्टी, सुवर्णा पट्टणशेट्टी, सदाशिव धनगर, दिनेश पाटील, सीईओ शशिकांत आदन्नावर यांच्यासह सभासद व
कर्मचारी उपस्थित होते.
संचालक श्रीकांत परमणे यांनी प्रास्ताविक केले. दिलीप गायकवाड यांनी आभार मानले केले.