
निपाणीच्या गुरुनाथ पुजारीचे यश; आई-वडिलांचे स्वप्न साकार
निपाणी (वार्ता) : गावोगावी, यात्रा-जत्रामध्ये हातगाडीवर आईस्क्रिम विक्रिचा व्यवसाय करीत आपला मुलगा कांहीतरी करावा, त्याचे देश सेवेत योगदान रहावे, या ध्येयाने प्रेरित होवून येथील दिवेकर कॉलनीतील विजय पुजारी यांनी अथक परिश्रम घेत आपला मुलगा गुरूनाथ पुजारी यांना स्वतः अर्धपोटी राहून शैक्षणिक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या. त्यामुळेच आज गुरुनाथ हा देशसेवेत रूजू झाला आहे. त्यामुळे आई-वडिलांचे स्वप्न साकार झाले आहे.
वडीलांचे स्वप्न पूर्ण व्हावे, यासाठी सैनिक भरती होवून देशसेवा करावी या हेतूने जिद्द, परिश्रम आणि चिकाटीने कार्यरत राहून गुरूनाथ पुजारी याने सिमा सशस्त्र बल सैन्य दलात प्रवेश मिळविला आहे. गुरूनाथची वर्णीसैन्य दलात लागल्याने या
परिसरातील रहिवाशां ची मानेही अभिमानाने उंचावली आहेत. सैन्य दलातील देशसेवेची शपथविधी उरकून घरी परतलेल्या गुरूनाथ याचे कुटुंबीयांसह मित्रमंडळी व नातेवाईकांनी जल्लोषी स्वागत केले.
घरच्या हलाखीच्या परिस्थितीत यशाचे ध्येय समोर ठेवून मात-पित्यांचे स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द उराशी बाळगून गुरूनाथने सैन्य दलात सामील होण्याच्या सर्व खडतर परीक्षा लिलया पार करून त्याने सिमासुरक्षा दलात प्रवेश मिळविला.
त्याची आसाम रायफल्स ६४ युनिटमध्ये नियुक्ति झाली आहे. रविवारी (ता.७) गुरूनाथची पहिली तैनाती भुतान सिमेवर करण्यात आली. देशसेवेसाठी तो भूतानच्या सीमेवर रवाना झाला. येथील नागरिकांनी त्यांनाआनंदात निरोप दिला. गरीब कुटुंबातील मुलाला देशसेवेची संधी मिळाल्याने त्याचे वडील विजय पुजारी आणि आई यांनी समाधान व्यक्त केले आहे. यापुढेही निपाणीचा गौरव अशाच प्रकारे उंचावणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta