Tuesday , March 3 2026
Breaking News

‘मावळा ग्रुप’ची २४ फेब्रुवारीला ‘शिवनेरी’ मोहीम

Spread the love

 

पदाधिकाऱ्यांची माहिती; यंदा महिलांचाही सहभाग

निपाणी (वार्ता) : येथील मावळा ग्रुप तर्फे दरवर्षी गड किल्ले मोहीम राबविले जाते. यंदा तिसऱ्या वर्षी २४ आणि २५ फेब्रुवारीला किल्ले शिवनेरी येथे ही मोहीम राबवली जाणार आहे. त्यामध्ये यंदा प्रथमच महिला आणि युवतींचा सहभाग राहणार असल्याची माहिती ग्रुपचे अध्यक्ष आकाश माने खजिनदार राहुल भाटले यांनी दिली. मंगळवारी (ता.९) सकाळी आयोजित बैठकीत ते बोलत होते.
आकाश माने म्हणाले, पहिल्या वर्षी रायगड दुसऱ्यावर्षी राजगड आणि यंदा शिवनेरी येथे ही मोहीम जाणार आहे. त्यामध्ये सुमारे ३५० मावळे सहभागी होणार आहेत. शिवनेरी किल्ल्यावर राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म दिला. त्या गडाची माहिती व्हावी, या उद्देशाने यंदा पहिल्यांदाच महिलांना त्यामुळे सहभागी करून घेण्यात येणार आहे.
२४ फेब्रुवारी रोजी पहाटे ४.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातून या मोहिमेला प्रारंभ होणार आहे. तेथून लेण्यांद्री येथे सायंकाळी मुक्कामाची सोय केली आहे. पहाटे गणेश दर्शन झाल्यानंतर २५ फेब्रुवारीला शिवनेरी दर्शन होणार आहे. मावळ्यांसाठी नाष्टा भोजन आणि बसची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे मोहिमेत सहभागी होणाऱ्या मावळ्यांनी मावळा ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. शांतिनाथ मुदुकुडे यांनी स्वागत केले.
बैठकीस ग्रुपचे उपाध्यक्ष महादेव चव्हाण, सल्लागार उदय शिंदे, संचालक मंगेश लठ्ठे, विशाल बुडके, उमेश गंथडे, संगमेश जाधव, दादासाहेब जनवाडे, सुशांत कांबळे, अनिल चौगुले, सागर पाटील, संदीप माने, संजय चिकोडे यांच्यासह सदस्य उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘पंचहमी’ योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी सहकार्य करावे

Spread the love  गॅरंटी योजना कमिटी अध्यक्ष रमेश जाधव ; निपाणी तालुका पातळीवरील बैठक निपाणी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *