Tuesday , March 3 2026
Breaking News

स्वामी समर्थ पादुका परिक्रमात हजारो भाविकांचा सहभाग

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी अक्कलकोटला जाता येत नाही. अशा स्वामी भक्तांना श्री स्वामींचे दर्शन सहज उपलब्ध व्हावे, या उद्देशाने ‘निपाणी भाग श्री स्वामी समर्थ सेवा समितीने’ परिक्रमेचे आयोजन केले होते. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या ‘पादुका परिक्रमा’ मंगळवारी (ता. ९ ) सायंकाळी निपाणी शहरांमधील व्यंकटेश मंदिर, गांधी चौक येथे दाखल झाल्या होत्या.
यावेळी दर्शनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. रात्री ८ वाजता गजानन कुलकर्णी यांच्या हस्ते आरती करून महाप्रसाद वाटप करण्यात आले.
बुधवारी (ता.१०) रोजी पहाटे ६ वाजता प्राजक्ता थिटे यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. स्वामी कृपा, शिवाजी नगर, व्यायाम शाळे जवळ, ऍड. मुकुंद कुलकर्णी आणि शरद थिटे यांच्या हस्ते पूजन झाले. या ठिकणी सकाळी ७ ते ८ पर्यंत भाविकांनी स्वामी समर्थ पादुकांचे दर्शन घेतले.त्यानंतर पुढील प्रवासासाठी पादकांचे प्रस्थान झाले.
यावेळी भाऊराव कुलकर्णी, शरद थिटे, एम. व्ही. कुलकर्णी, रमेश कदम, वेदांत गळतगे, अजित कुलकर्णी, दशरथ कदम, राजू कुलकर्णी, सचिन फुटाणकर, मंदार कुलकर्णी, वर्षा थिटे, आराधना जोशी, अपर्णा कुलकर्णी, रेश्मा कुलकर्णी, सुरेखा इनामदार, ओंकार शिंदे यांच्यासह भाविक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

निपाणी अक्कोळ रोडवर ‘बर्निंग’ व्हॅनचा थरार

Spread the love  नागरिकांच्या सतर्कतेमुळे वाचले चालकाचे प्राण निपाणी (वार्ता) : भरधाव जाणाऱ्या मारुती व्हॅनने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *