
निपाणी (वार्ता) : बेळगाव उत्तरचे आमदार आणि अंजुमन मुस्लिम बोर्डिंग कमिटीचे अध्यक्ष आमदार आसिफ उर्फ राजू सेठ यांचा येथील निपाणी मुस्लिम समाजाच्या वतीने शुक्रवारी (ता. १२) सायंकाळी ७ वाजता भिमनगर येथील अंजुमन हॉल येथे सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
आमदार राजू सेठ यांनी सर्व समाजाचा कैवार घेत मानवधर्म अग्रस्थानी ठेवून कोरोना महामारी च्या संकटकाळात अंजुमन मुस्लिम बोर्डिंगच्या माध्यमातून आपल्या जीवाची तमा न करता कोरोना महामारीशी समर्थपणे लढा दिला. त्यांच्या अजोड कार्यामुळे अनेकांचे वाचविण्यात यश आले. त्यामध्ये निपाणीतीलही मोठ्या प्रमाणात कोरोना रूग्णांचा सहभाग होता. त्याचबरोबर त्यांनी प्रत्येकवेळा समाजहित साधत सर्व समाजबांधवांची तत्परतेने मदतीचे कार्य केले आहे.
हजारो रूग्णांचे प्राण वाचवले आहेत. त्या पार्श्वभुमिवर येथील निपाणी मुस्लिम समाजाच्या वतीने त्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी सर्व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने हजर रहावे असे आवाहन संयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta