
निपाणी (वार्ता) : सहापदरी रस्ता कामासाठी आलेल्या वेस्ट बंगाल येथील कर्मचाऱ्यांचा निपाणी येथे मृत्यू झाला. राजेश दपाऊराव (वय २८) असे मयत झालेल्या कामगाराचे नाव आहे.
राजेश हा तीन वर्षापासून सहापदरी रस्ते कामासाठी लागणाऱ्या सिमेंट बॅरिकेट्स तयार करणाऱ्या एका इंन्फ्रा कंपनीमध्ये कामावर होता. त्यांचे काम शहराबाहेरील ३० नंबर बिडी कारखान्याच्या मागे चालू होते. दुपारी काम सुरू असताना अचानकपणे राजेश हा साहित्य चढविणाऱ्या वाहनात थांबल्याने त्याला हायड्रोलिक वायरचा धक्का बसला. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी येथील सरकारी महात्मा गांधी रुग्णालयात दाखल केले. मात्र तत्पूर्वी त्याचा मृत्यू झाला. याबाबत मयत राजेश यांचा भाऊ रॉबिन रॉय यांनी फिर्याद दिली असून तपास उपनिरीक्षक उमादेवी यांनी चालवला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta