Thursday , September 19 2024
Breaking News

राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत सद्गुरु तायक्वांदो अकॅडमीचे यश

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : होसदुर्ग येथे दुसरी खुली राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेमध्ये फाईट, पूम्से व स्पीड पंच अशा स्वरूपात स्पर्धा झाल्या. त्यामध्ये येथील सद्गुरु अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले. सद्गुरू तायक्वांदो अकॅडमीला बेळगाव जिल्ह्यात द्वितीय क्रमांकाचे चषक देऊन गौरविण्यात आले.
शार्विन बिकणावर, सार्थक निर्मले, श्रीविराज मोहिते, बल्लाळेश्वर मिरजे, अथर्व शेळके, पुष्पा पाटील, अवनी व्हदडी, सोनम कदम, प्रभू हुगार, समर्थ एड्रामी, समर्थ निर्मले, पूर्वा साळुंखे, लावण्या सावंत, अवनी कुलकर्णी, समर्थ पाटील, रूही बोधले, आरुषी बोधले, दींया तिप्पे, नूतन मोहिते, श्रेया मोहिते, वेदांत हतकर, मुग्धा कदम, समर्थ जाधव, स्वराज पाटील, अनिरुद्ध तीपुकडे, साक्षी पोवार, श्रद्धा पोवार, श्रेयस शेळके, श्रावणी इंगळे, ध्रुव इंगळे, यांनी सहभाग घेऊन प्रत्येकी सुवर्णपदक, रौप्य पदक, व कांस्यपदक पटकावले. विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र व गौरवचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यशस्वी विद्यार्थ्यांना तायक्वांदो प्रशिक्षक बबन निर्मले यांच्यसह प्रशिक्षक विजय नाईक यांचे मार्गदर्शन लाभले. या स्पर्धेमध्ये बेळगाव जिल्ह्यातून निपाणी, चिक्कोडी, संकेश्वर, गोकाक, अथणी, एकसंबासह राज्यातून ३८० मुला, मुलींनी सहभाग घेतला होता.

About Belgaum Varta

Check Also

देशाच्या बांधणीमध्ये अभियंत्यांचे मोठे योगदान

Spread the love  मंडल पोलीस निरीक्षक तळवार; निपाणीत अभियंता दिन निपाणी (वार्ता) : एम. विश्वेश्वरय्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *