
निपाणी (वार्ता) : कर्नाटक शासनातर्फे बुधवारी (ता. १७) होणाऱ्या क्रांतिवीर संगोळी रायाण्णा उत्सवानिमित्त उत्सवानिमीत्त मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवाचा प्रसार करण्यासाठी बेळगांव जिल्ह्यातील १५ तालुक्यातून क्रांतीवीर संग्गोळी रायण्णा उत्सव ज्योतीचे स्वागत करण्यात येत आहे. शनिवारी (ता.१३) सकाळी येथे चिक्कोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांच्या हस्ते रॅलीचे स्वागत करण्यात आले.
ही रॅली १७ जानेवारीला उत्सवस्थळी जाणार आहे. या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देशातील अत्यंत भव्य असे ५० एकरात उभारण्यात आलेले क्रांतीवीर संग्गोळी रायण्णा सैनिक शाळेचे आणि सेव्हण डी संग्रालय नंदगड येथे होणाऱ्या १३ एकरातील संग्रालयाचे उदघाटन होणार असल्याचे चिंगळे यांनी सांगितले.
यावेळी बैलहोंगलचे आमदार महांतेश कौजलगी, पालकमंत्री सतिश जारकिहोळी, महिला बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, कन्नड व सास्कृतीक मंत्री शिवराज तंगडगी यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
शासकीय विश्रामधाम येथे तहसिलदार मुजफ्फर बळीगार, पालिका आयुक्त जगदीश हुलगेज्जी व मान्यवरांच्या उपस्थितीत रॅलीचे पूजन झाले. रॅली निपाणी नगरपालिका, कित्तूर चन्नम्मा सर्कल, महात्मा बसवेश्वर चौक येथे पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून चिक्कोडीकडे रवाना झाली.
यावेळी उपतहसिलदार मृत्यूंजय ढंगी, अन्न नागरी पुरवठा अधिकारी अभिजीत गायकवाड, पंचायत व्यवस्थापकर सुदिप चौगुला, महसूल निरीक्षक सुनिल कांबळे, उपनिरीक्षक डी. बी. कोतवाल, विवेक जोशी, विनायक जाधव, एस. के. खजण्णावर, तहसिल कार्यालयाचे अधिकारी, महसूल अधिकारी, पॉलिका अधिकारी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta