निपाणी (वार्ता) : अक्कोळ येथील दिवंगत मलगौंडा नरसगौंडा पाटील (कट्टीकल्ले) यांनी सुरू केलेल्या श्री सद्गुरू पंत महाराज बाळेकुंद्रीकर यांचा १०८ व्या उत्सवास शुक्रवारपासून (ता.१२) झाला आहे. त्यानिमित्त शुक्रवारी (ता.१२) सकाळी १० वाजता अभिषेक, ओम नमः शिवाय जप, भजन व आरती, शनिवारी (ता.१३) रात्री आरती व भजन, रविवारी (ता.१४) सायंकाळी सहा वाजता श्रीपंत घराण्यांच्या मंडळींचे आगमन, प्रेमध्वज मिरवणूक व किर्तन झाले. सोमवारी (ता.१५) सकाळी आठ वाजता श्री पंत पालखीची मिरवणूक, सायंकाळी ५ वाजता जन्म काळ, पाळणा भजन व त्यानंतर महाप्रसादाचे वाटप झाले.
मंगळवारी (ता.१६) सकाळी आठ वाजता विविध शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. जनरल बैलगाडी शर्यतीसाठी १० हजार, ७ हजार, ५ हजार रुपयाची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. जनरल घोडा -बैलगाडी शर्यतीसाठी ५ हजार, ३ हजार २ हजार रुपयाची बक्षिसे दिली जाणार आहेत. जनरल पाडा- बैल गाडी शर्यतीसाठी ५ हजार, ३ हजार २ हजार रुपयाची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. सायंकाळी उत्सव मूर्ती पोहोचवून सोहळ्याची सांगता होणार असल्याचे डॉ. संजय पंतबाळेकुंद्री यांनी सांगितले.