निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील जय गणेश मल्टीपर्पज को-ऑप. क्रेडिट सोसायटी व गौरी गणेश महिला सोसायटीतर्फे संक्रांतीनिमित्त सर्व रोग निदान आरोग्य शिबीर पार पडले. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून ४०० रुग्णांची तपासणी करण्यात आली.
संस्थापक अध्यक्ष अभय मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिराचे उद्घाटन सहकाररत्न उत्तम पाटील व उद्योजक अभिनंदन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
उत्तम पाटील म्हणाले, नगरसेवक अभय मगदूम हे कर्तबगार आणि समाज हितासाठी सदैव झटणारे नेतृत्व आहे. त्यांनी केलेल्या कार्या मुळे आरोग्य व रक्तदान शिबिर राबवले जात आहे. रक्तदान, नेत्ररोग दंतरोग, बीपी, शुगर, तसेच विविध आजारांवर या ठिकाणी मोफत निदान शिबिर आयोजन करून सामाजिक बांधिलकी जपल्याचे सांगितले.
अभय मगदूम यांनी, समाजाचे ऋण फेडण्यासाठी सदैव तत्पर आहोत. संस्थेच्या माध्यमातून असे विविध उपक्रम नेहमी राबवत असल्याचेही सांगितले. उद्योजक अभिनंदन पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी बोरगाव दिवंगत ज्येष्ठ नेते बाबुराव मगदूम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलाने या शिबिरास प्रारंभ झाला. कार्यक्रमास पृथ्वीराज पाटील, अशोक पाटील, पोपट पाटील, राजु मगदुम, प्रदीप माळी, अभयकुमार करोले, दिगंबर कांबळे, रोहित पाटील, तुळशीदास वसवाडे, अरुण बोने, जयपाल हावले, अश्विनी मगदूम, तेजपाल मगदूम, मनोजकुमार पाटील, राजशेखर हिरेमठ यांच्यासह जय गणेश मल्टिपर्पज सोसायटी, व गौरी गणेश महीला संघाचे संचालक अंगणवाडी, आशा कार्यकर्ते उपस्थित होते.