Monday , December 8 2025
Breaking News

उत्तम पाटील यांच्या पाठीशी खंबीर : माजी मंत्री शरद पवार

Spread the love

 

रावसाहेब पाटील, उत्तम पाटील यांचा सत्कार

निपाणी (वार्ता) : सहकार चळवळीच्या माध्यमातून सहकारत्न रावसाहेब पाटील यांनी कर्नाटकासह महाराष्ट्रात शैक्षणिक, सामाजिक धार्मिक कार्य केले आहेत. सहकारामुळेच या भागातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले आहे त्यांनी संघ संस्था कारखाने उभे करून अनेक बेरोजगारांना काम उपलब्ध करून दिले आहे. सामाजिक बांधिलकी आणि कष्टामुळेच हे पाटील कुटुंबीयांनी दाखवून दिले आहे. या पुढील काळात उत्तम पाटील यांच्या पाठीशी खंबीर आहोत, असे मत माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले.
दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील (दादा) यांना कर्नाटक जैन असोसिएशन यांच्यावतीने जैनधर्मप्रभावक पुरस्कार व युवा नेते उत्तम पाटील यांना कर्नाटक राज्याचा सहकाररत्न पुरस्कार असे प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले आहेत. त्यानिमित्त त्यांचा शरद पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
शरद पवार म्हणाले, विश्वास आणि पारदर्शी कारभारामुळेच त्यांच्या संस्थेच्या शाखा महाराष्ट्रात सुरू झाल्या आहेत. उत्तम सेवेमुळेच ठेवीदारांची संख्या वाढत आहे. अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसह व्यवसायिकांना त्यातून बाहेर काढण्याचे काम अरिहंत उद्योग समूहाने केले आहे. तसेच कोरोनाअतिवृष्टी महापूर काळातही सर्वसामान्यांना मदतीचा हात दिला आहे. त्यामुळेच पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवूनही ६६ हजारावर मते मतदारांनी दिली आहेत. या पुढील काळात येणाऱ्या निवडणुकीत उत्तम पाटील उभे राहत असल्यास त्यांच्या पाठीशी आपण खंबीर आहोत. अशाच प्रकारे मतदारांनी त्यांना साथ देऊन या पुढील काळात निवडणुकीत त्यांना विजय केल्यास निपाणी मतदारसंघाचा विकास होणार असल्याचे सांगितले.
माजी मंत्री जयंत पाटील यांनी, ग्रामपंचायत निवडणुकीतील मिळालेले यश आणि उत्साह टिकून ठेवले पाहिजे. माता-भगिनींची सात असल्यास कुठल्याही निवडणुकीत विजय निश्चित आहे. उत्तम यांचे भवितव्य उत्तम आहे मतदारांनी साथ देऊन त्यांचे यश वाढविण्याचा निर्धार करावा. केंद्रातील सरकारने यापूर्वी बजरंग बली सा तर आता रामाचा आशीर्वाद घेत आहे. या उलट महागाई, बेकारी कडे दुर्लक्ष केले आहे. देशाची अवस्था बिकट होत चालली आहे. आपले झाकण्यासाठी सरकार नको ते मुद्दे पुढे आणत आहेत. उत्तम पाटील यांच्यासारखा कणखर नेता मतदारांनी शोधला आहे. अपयशानंतर आता यशाकडे वाटचाल सुरू असून सर्वांनी त्यांना साथ देण्याचे आवाहन केले.
माजी आमदार प्रा. सुभाष जोशी यांनी, उत्तम पाटील यांना २०२३ सालची उमेदवारी घोषणा केलेल्यानीच त्यांना फसवले आहे. निवडणुकीप्रमाणेच आताही मतदारांची गर्दी असून हे शरद पवार यांचे आशीर्वाद आहेत. पराभव झाला तरीही लढत राहिल्यास यश निश्चित असल्याचे सांगितले.
सहकाररत्न उत्तम पाटील यांनी, सहकार महर्षी रावसाहेब पाटील यांनी आयुष्यभर ज्यांना साथ दिली त्यांनीच निवडणुकीच्या वेळी पाठ फिरवली. शिवाय शरद पवार यांनी राष्ट्रवादी पक्षाचे तिकीट देऊन आपणाला निवडणूक लढवण्यास मदत केली. कोणतीही सत्ता नसताना संघ संस्थांच्या माध्यमातून सर्वसामान्यांची कामे करीत आहोत. या पुढील काळातही शरद पवार यांनी आपणाला साथ दिल्यास हा लढा असाच पुढे घेऊन जाणार असल्याचे सांगितले.
यावेळी अशोक कुमार असोदे, प्रकाशरावजी मोरे, सचिन पोवार, राजवर्धिनी पाटील, प्रा. बाळासाहेब सूर्यवंशी, सोनू कदम, संभाजी थोरवत यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी सीमा पाटील यांनी स्वागत केले. व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. सौंदरगाव येथील शिक्षण संस्थेला देणगी स्वरूपात दिलेल्या कामाचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते झाले. सहकार महर्षी रावसाहेब पाटील सहकारत्न उत्तम पाटील यांचा शरद पवार व जयंत पाटील यांच्या हस्ते सत्कार झाला. यावेळी व्यासपीठावरील मान्यवरासह ग्रामपंचायत पदाधिकारी विविध संघ संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार झाला. यावेळी निपाणी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. प्रा. सचिन खोत यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

बोरगाव पट्टणपंचायतीच्या निधीतून आयको परिसरात पाणी योजनेचे उद्घाटन

Spread the love  निपाणी (वार्ता) : बोरगाव उपनगर असलेल्या आयको येथील मल्लिकार्जुन नगरमधील नागरिकांना अनेक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *