
चोर सीसीटीव्ही मध्ये कैद : सर्वत्र घबराटीचे वातावरण
कोगनोळी : येथील मुख्य रस्त्यावर असणाऱ्या दुकानात चोरी करण्याच्या प्रेयत्नात असणाऱ्या चोरट्यांचा डाव फसल्याची घटना रविवार, सोमवारी पाहटे घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, येथील मुख्य रस्त्यावर किरण चव्हाण यांचे अदित्य बाजार आहे. सोमवारी किरण चव्हाण नेहमीप्रमाणे रात्री दुकान बंद करून घरी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी दुकान उघडण्यास आले असता चोरीचा प्रयत्न झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. ताबडतोब त्यांनी दुकानात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून पाहणी केली. दुकानात चोरीचा प्रयत्न झाल्याचे दिसून आले. सदर अज्ञात चोरटे कार घेऊन दुकानाच्या दारात गाडी उभी करून त्यातून उतरून दुकानाचे निरीक्षण करताना व दुकानाचे शटर उघडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. पहाटेची वेळ असल्याने गावातील लोक ग्रामदैवत अंबिका देवीच्या दर्शनासाठी व व्यायाम व फिरण्यासाठी जात होते. त्याचबरोबर रस्त्यावरून वाहतूक मोठ्या प्रमाणात असल्याने अज्ञात चोरट्यांचा डाव फसल्याचे दिसून आले. एक वर्षांपूर्वी हणबरवाडी रोडवरील सी वाय पाटील यांच्या घरी अज्ञात चोरट्याने जबरी चोरी केली होती. घरातील लोकांना मारहाण करून मोठी रक्कम व दागिने लंपास केले होते. गावात एक वर्ष पूर्ण होताच चोरीचा प्रयत्न झाल्याने नागरिकात भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी चोरट्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta