
निपाणी (वार्ता) : आयोध्या येथे सोमवारी (ता.२२) श्रीरामचंद्राची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे. संपूर्ण देशात या सोहळ्यामुळे नवचैतन्य व भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. देशवासीयांसाठी हा दिवस पवित्र व सात्विक होत आहे. या दिवशी अनेक मंदिरामध्ये भजन, कीर्तन, सामूहिक नामजप ,महाप्रसाद असे कार्यक्रम होणार आहेत. त्यामुळे या दिवशी निपाणी भागात मांस, मच्छी, मांसाहार व मद्य याची विक्री बंद ठेवून या होणाऱ्या पवित्र कार्यात सहभाग होऊन उत्सव साजरा करण्यात यावा, यासाठी श्रीराम सेना कर्नाटक यांच्यातर्फे उपतहसीलदार मृत्युंजय डंगी यांना निवेदन देण्यात आले.
याशिवाय निपाणी नगरपालिका आयुक्त जगदीश हुलगेज्जी यांनाही निवेदन देऊन मांस, मद्य विक्री बंद करण्यासाठी विनंती करण्यात आली. यावेळी श्रीराम सेनेचे निपाणी तालुका प्रमुख अमोल चेंडके, बबन निर्मले, अजित पारळे, अजित पाटील, चारुदत्त पावले, रवींद्र शिंदे, पवन अंकुशे, आर्यन माने, प्रथमेश माने यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta