Wednesday , December 10 2025
Breaking News

‘अरिहंत’च्या संगणकेरी शाखेचे सोमवारी उद्घाटन

Spread the love

 

संस्थापक अध्यक्ष रावसाहेब पाटील

निपाणी (वार्ता) : संस्थेची व्याप्ती वाढवून संस्थेच्या विविध ठेवी व कर्ज योजनांचा लाभ सर्वसामान्य सभासद शेतकऱ्यांना मिळावा, या उद्देशाने बोरगाव येथील श्री अरिहंत को-ऑप क्रेडिट सोसायटी (मल्टीस्टेट) या संस्थेच्या मुडलगी तालुक्यातील संगणकेरी शाखेचे सोमवारी (ता.२२) उद्घाटन होणार असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, सहकार रत्न रावसाहेब पाटील यांनी दिली. बोरगाव येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते.
रावसाहेब पाटील म्हणाले, सहकार क्षेत्रात काम करीत असताना अरिहंत संस्थेच्या माध्यमातून नेहमीच सभासदांच्या हिताचे निर्णय घेण्यात आले आहेत. शेती, दुग्ध व्यवसाय, ग्रामीण विकास, युवकांना रोजगार, महिलांचे सबलीकरण हे सहकार क्षेत्र विना होऊ शकत नाही. या हेतूने कर्नाटक राज्यासह मल्टीस्टेटच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील शाखा विस्तारित केली आहे. मुडलगी तालुक्यातील संगणकेरी येथेही शाखा व्हावी, अशी मागणी सभासदांनी केली आहे. संगणकेरी येथील हिप्परगी बिल्डिंगमध्ये शाखेचे उद्घाटन होणार आहे. अरभावी विधानसभा मतदारसंघाचे आमदार भालचंद्र जारकीहोळी यांच्या हस्ते शाखेचे उद्घाटन होणार आहे. सहकाररत्न उत्तम पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन रावसाहेब पाटील यांनी केले.
बैठकीस संस्थेचे उपाध्यक्ष सतीश पाटील, कार्याध्यक्ष अभिनंदन पाटील, सीईओ अशोक बंकापुरे, सहाय्यक प्रधान व्यवस्थापक शांतिनाथ तेरदाळे, अभिनंदन बेनाडे, संगणकेरी शाखेचे शाखा अधिकारी राजेंद्र पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

निपाणीत शस्त्रधारी चोरट्यांकडून धाडसी घरफोडीचा प्रयत्न

Spread the love  चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद : चोरटे धावले पोलिसांच्या अंगावर निपाणी-(वार्ता) : शहरासह उपनगरात …