
लक्ष्मणराव चिंगळे :निपाणीत पूर्व तयारीबाबत बैठक
निपाणी (वार्ता) : कर्नाटक शोषित समुदायांचे ग्रँड युनियन,अल्पसंख्याक आणि मानवतावादी संघटना याच्या संयुक्त विद्यमाने संविधान, सामाजिक न्याय, सहअस्तित्व आणि स्वाभिमान जपण्यासाठी शोषितांच्या जागृतीसाठी चित्रदुर्ग येथे राज्य अधिवेशन मुख्यमंत्री सिद्धरामय्या, सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार (ता. २८) सकाळी ११ वाजता होणार आहे. हे अधिवेशन यशस्वी करावे, असे आवाहन चिक्कोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यानी केले. येथील शासकीय विश्रामगृहात मानव बंधुत्व वेदिके, दलित, मुस्लीम बांधवाच्या उपस्थितीत पुर्वतयारी बैठक शुक्रवारी (ता.१९) झाली. या सप्रसंगी ते बोलत होते.
सुशांत खराडे यांनी स्वागत केले. चिंगळे म्हणाले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ दलितांना आरक्षण दिले नाही, तर ते इतरानाही मिळवून दिले आहे. मात्र देशातील भाजप जातीधर्माचे राजकरण करत आहे. वंचित जातींना आरक्षण देऊन, सामाजिक समतेचा संदेश देणारे कर्नाटक हे आघाडीचे राज्य आहे. अनेक मागासवर्गीय आयोगांनी शास्त्रीय अभ्यास करून आरक्षणाची अंमलबजावणी केली आहे. देशातील लोकशाही टिकवण्यासाठी अशा मेळाव्याची गरज ओळखून त्याअनुषंगाने हे अधिवेशन आयोजीत केले आहे. निपाणी भागातून हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून अधिवेशन यशस्वी करावे.
यावेळी रमेश मादर, एन. बेज. करवन्नावर, भरमान्ना तोळी, कमला करन्नावर, जरारखान पठाण यांनी मनोगत व्यक्त केले. बैठकीस बसवराज काडापुरे, महादेव कौलापुरे, जगदीश हेगडे, विश्वास आबणे, मल्लिकार्जुन घस्ते, मंजुनाथ हिरवे, अविनाश कांबळे, प्रवीण माने, प्रवीण सौंदलगे, विश्वास आबणे यांच्यासह विविध शोषित घटक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. महेश धम्मरक्षित यांनी स्वागत तर गोरखनाथ मधाळे यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta