
निपाणी (वार्ता) : येथील छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित नूतन मराठी विद्यालय प्राथमिक, माध्यमिक विभाग आणि श्री वेंकटेश्वरा पि. यू. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमानाने विज्ञान व चित्रकला प्रदर्शन भरविण्यात आले होते.
अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा अलका धुमाळ होत्या. प्रमुख पाहुणे संस्थेचे संचालक विक्रमादित्य धुमाळ होते.
अलका धुमाळ यांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रकल्पांचे कौतुक करत विद्यार्थ्यांनी संशोधन वृत्ती जोपासणे गरजेचे आहे असल्या सांगितले. विक्रमादित्य धुमाळ यांनी, मुलांमध्ये संशोधक लपला आहे. त्याला जागृत करणे आवश्यक असल्याचे सांगितले. मुख्याध्यापक एस. एस. पचंडी यांनी, विज्ञान प्रदर्शनाचा उद्देश सांगून त्यांनी विद्यार्थ्यांच्या व्यापक वैज्ञानिक दृष्टिकोनाचे कौतुक केले.
विद्यार्थ्यांनी जलाशयाचे संरक्षण, वाहतूक आणि दळणवळण, डिजिटल व तांत्रिक समाधान, सदृढ आरोग्य, होलोग्रम, पेरिस्कोप, यासह विविध प्रयोग सादर केले होते. चित्रकला प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी व्यक्तिचित्र, निसर्ग चित्रे उत्कृष्टपणे रेखाटली होती. यावेळी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक व्ही. एम. बाचणे, विज्ञान शिक्षक एस. बी. पवार, चित्रकला शिक्षिका एस. आय. किवंडा, एम. डी. खोत, यु. आर. पवार, व्ही. बी. पाटील, आर. एस. चव्हाण, यु. वाय.आवटे, एस. पी. जगदाळे, एस. आर. सकपाळ, ए. एम. कुंभार, एस. एस. कुलकर्णी, एस. के. जोशी, यु. एम. पाटील, आर. एस. चव्हाण, आर. एस. माने यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta