निपाणी (वार्ता) : येथील दिवेकर कॉलनीमध्ये असलेल्या प्राचीन हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार माजी नगराध्यक्ष विजय शेटके यांच्या पुढाकाराने करण्यात आला. याप्रसंगी सत्यनारायण महापूजा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी सुनील घोटणे व विनोदीनी घोटणे यांच्या हस्ते सत्यनारायण पूजा करण्यात आली. विजय शेटके व दत्तात्रय कांबळे यांच्या हस्ते हनुमान मंदिरात पूजा करण्यात आली. यावेळी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमास नगरसेवक विलास गाडीवड्डर, गजेंद्र पोळ, माजी सभापती किरण कोकरे, विश्वास पाटील, संदीप कामत, बबन घाटगे, सुभाष कांबळे, धनाजी निर्मळे, मुकुंद रावण, दिलीप जाधव, सामाजिक कार्यकर्ते युवराज पोळ, अशोक लाखे, रवी श्रीखंडे, शशिकांत चडचाळे, जीवन घस्ते, सुरेश गाडीवड्डर, किसन दावणे, प्रकाश पोटजाळे, सागर कांबळे, नितीन शेटके, युवराज शेटके तुमच्यासह नागरिक उपस्थित होते.