
प्रतिकृती पाहण्यासाठी अबाल, अबालवृध्द नागरिकांची गर्दी
निपाणी (वार्ता) : सोमवारी (ता.२२) सर्वत्र आयोध्यातील राम मंदिरात मूर्ती प्रतिष्ठापणा कार्यक्रमाचा आनंद सर्वांनी घेतला. त्यानिमित्त निपाणी सह परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मूर्ती प्रतिष्ठानच्या पार्श्वभूमीवर कामगार चौकातील निपाणीच्या माजी उपनगराध्यक्षा सुमन चंद्रकांत पाटोळे यांच्या स्नुषा भारती किरण पाटोळे यांनी सांसारीक जबाबदारी सांभाळत कागदी पूट्टा, आगपेटी आणि इतर साहित्याचा वापर करून अयोध्येतील श्री. राम मंदिराची प्रतिकृती साकारली आहे. ही प्रतिकृती पाहण्यासाठी निपाणी आणि परिसरातील नागरिकांनी दिवसभर गर्दी केली होती.

सलग आठ ते दहा दिवस थोडे, थोडे काम करून सोमवारी (ता.२२) दुपारी १२ .४८ मिनिटांनी मंदिराच्या प्रतिकृतीमध्ये श्रीराम प्रतिमा ठेऊन त्याचे पुजन व आरती परिसरातील भगिनीच्या उपस्थित केले. अयोध्यतील श्री. राम मंदीर प्रतिकृती तयार करणाऱ्या भारती त्यांना सहकार्य करणाऱ्या त्यांचे चिरंजीव वेदांत पाटोळे यांचेही सर्वत्र कौतुक होत आहे. ही कलाकृती पाहण्यासाठी मेस्त्री गल्ली, कामगार चौक, वागळे गल्लीतली व परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती.
Belgaum Varta Belgaum Varta