निपाणी (वार्ता) : गेल्या काही वर्षापासून निवडणुकीच्या वेळी मतदानासाठी ईव्हीएम मशीनचा वापर केला जात आहे. त्यामध्ये घोटाळा असून येथून पुढे होणाऱ्या निवडणुकांमध्ये ईव्हीएम मशीन वापरू नयेत. यासाठी ईव्हीएम हटाओ, देश बचाओ संविधान बचाओ, लोकतंत्र बचाओ, मोर्चा गुरुवारी (ता.२५) येथील तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर येथील शासकीय विश्रामगामावर बैठक घेऊन नियोजन करण्यात आले.
निपाणी तालुक्यातील जागृत आणि सुज्ञ नागरिकांनी ‘ईव्हीएम हटाव लोकतंत्र बचाव संविधान बचाव’ या मोर्चास उपस्थित राहण्याचे आवाहन बैठकीत करण्यात आले. यावेळी वकील
अविनाश कट्टी, राजू मिस्त्री, प्रवीण सौंदलगे, अशोक लाखे, जरारखान पठाण, जगदीश हेगडे, किरण कांबळे, नितीन कानडे, अमर दाभाडे (सरकार) नरजीत विटे, बाळासाहेब कांबळे, संतोष अदवाडे यांच्यासह निपाणी परिसरातील नागरिक उपस्थित होते.