Tuesday , March 3 2026
Breaking News

धनलक्ष्मी क्रेडिट सौहार्दच्या अध्यक्षपदी रवींद्र शिंदे, उपाध्यक्षपदी मधुकर खवरे

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : येथील धनलक्ष्मी क्रेडिट सौहार्द संस्थेची २०२३ ते २०२८ या कालावधीसाठी निवडणूक बिनविरोध झाले. त्यामध्ये नगरसेवक रवींद्र शिंदे यांची अध्यक्षपदी तर मधुकर खवरे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून सहकार खात्याचे डेप्युटी डायरेक्टर एस. एम. आप्पाजीगोळ यांनी काम पाहिले.
नूतन संचालक म्हणून सुनील वाडकर, महेंद्र सांगावकर सुनील काळजी राहुल शिंदे सुभाष कुकडे, अनिल सांगावकर, विजय साळोखे, वीरेंद्र येडूरे, परशराम कांबळे, सुनीता शिंदे, सुप्रिया चोरगे यांची निवड करण्यात आली. नूतन पदाधिकाऱ्यांचा संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे सभासद व कर्मचारी उपस्थित होते. नितीन साळुंखे यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

निपाणी अक्कोळ रोडवर ‘बर्निंग’ व्हॅनचा थरार

Spread the love  नागरिकांच्या सतर्कतेमुळे वाचले चालकाचे प्राण निपाणी (वार्ता) : भरधाव जाणाऱ्या मारुती व्हॅनने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *