निपाणी (वार्ता) : ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला शॉर्टसर्किटमुळे अचानक लागलेल्या आगीत लाखो रुपयांची नुकसान झाल्याची घटना बोरगाव घडली. केवळ दैव बलवत्तर म्हणून जीवित हानी झालेली नाही.
याबाबत अधिक माहिती अशी, कर्नाटकातून हुपरी येथील जवाहर सहकारी साखर कारखान्यास नेणाऱ्या ट्रॅक्टर (क्र. के २८ टी. ए. ५१६९) बोरगाव जवळ आले असता विद्युत वाहिनीचा स्पर्श उसाला झाल्याने आग लागली. दोन्ही डब्यांना आग लागल्याने यावेळी मोठी तारांबळ उडाली. पण चालकाच्या प्रसंगवधानामुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही. घटनेची परिस्थिती लक्षात घेऊन चालकाने शहरातील एका खाजगी शाळेच्या कंपाउंडमध्ये ट्रॅक्टर उभा करून पूर्ण आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.
यावेळी जवाहर साखर कारखान्याच्या पदाधिकाऱ्यांनी तातडीने सदलगा येथील अग्निशामक दलाला संपर्क साधून अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांकडून आग आटोक्यात आणण्यात आले.
कर्नाटकातून जवाहर कारखान्यासाठी ऊस वाहतूक करणाऱ्या या ट्रॅक्टरमध्ये ओव्हरलोड ऊस वाहतूक भरण्यात आले होते. त्यामुळे कदाचित मुख्य वीज वाहिनीला उसाचे स्पर्श झाल्याचा अंदाज यावेळी उपस्थिततांकडून केला जात होता.
मल्लाप्पा धर्माप्पा सबसन्नावर या मालकांचे हे ट्रॅक्टर असून प्रदीप हरणाळ हा ट्रॅक्टर चालवत होता. ट्रॅक्टर बरोबरच उसाचेही मोठे नुकसान झाले आहे.