
निपाणी (वार्ता) : येथील साई नगरातील श्री सदगुरु साईनाथ विश्वस्थ मंडळातर्फे मंगळवारपासून (ता.१३) श्री साई यात्रा वार्षिकोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त बुधवार अखेर (ता.१४) विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवारी (ता.१३)सकाळी ६ वाजता डॉ. प्रियांका माने व डॉ. अभिषेक माने यांच्या हस्ते ध्वजारोहण, त्यानंतर सुवर्णा मेहता, अजित मेहता दांपत्यांचे हस्ते श्रींचा अभिषेक, महापुजा व आरती होणार आहे. सकाळी ९ वाजता राहुल मुर्तले यांच्या हस्ते अभिषेक,
मंदिर परिसरात साईबाबांची पालखी निघणार आहे. दुपारी १२ वाजता अभियंते सुनिल वरूटे दाम्पत्यांच्या हस्ते साईबाबांची मध्यान्ह आरती,
१२.३० वा. हळदी-कुंकू व साई महिला भजनी मंडळ तर्फे भजन कार्यक्रम, सायंकाळी ४ वा.सांस्कृतीक कार्यक्रम, रेकॉर्ड डान्स स्पर्धा व भरतनाट्यम सादर होणार आहे.
सायंकाळी ७ वा. दिलीप चव्हाण दांपत्यांच्या हस्ते धुपारती, रात्री १० वा. श्रींची महावीर टोणे, सुप्रित पाटील यांच्या हस्ते शेजारती होणार आहे.
बुधवारी (ता.१४) पहाटे काकड आरती, सकाळी श्रींचा अभिषेक, महापुजा, सकाळी ९ वा. श्री साई सच्चरित्र ग्रंथाचे सामुहिक पारायण, ११ प्राणलिंग स्वामींचे आशिर्वचन व महाप्रसादाची पुजा, दुपारी आरती झाल्यावर महाप्रसादाचे वाटप होणार आहे. त्यानंतर नागराळ येथील शिवलिंगेश्वर शिव भजनी मंडळ, साई महिला भजनी मंडळ, विरभद्र महिला भजनी मंडळ, रमेश गायकवाड यांचे भजन होणार आहे. रात्री दहा वाजता हाल शुगर साखर कारखान्याचे संचालक समित सासणे यांच्या हस्ते शेजारती होणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta