Monday , September 21 2026
Breaking News

येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाचे विविध पुरस्कार जाहीर

Spread the love

 

येळ्ळूर : रविवार दि.11 फेब्रुवारी 2024 रोजी, येळ्ळूर गावामध्ये, येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्या वतीने 19 वे येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनामध्ये साहित्यिक, सामाजिक, शैक्षणिक, पत्रकार, क्रीडा आणि कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींना विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

यामध्ये यंदाचा “राष्ट्रवीरकार शामराव देसाई साहित्य पुरस्कार” कोल्हापूरचे ज्येष्ठ साहित्यिक व संपादक श्रीराम पवार यांना देण्यात येणार आहे. हा पुरस्कार प्रा. अनंतराव देसाई यांच्याकडून देण्यात येतो. याचे स्वरूप, 5000/- रोख, शाल श्रीफळ व गौरव पत्र. “कै. मारुती पाटील (पेंटर) सामाजिक पुरस्कार” हा पुरस्कार अखिल भारतीय दलित युवा संघटनेचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते मल्लेश चौगुले यांना देण्यात येणार आहे, हा पुरस्कार येळ्ळूरचे परशराम पाटील यांच्याकडून देण्यात येतो, याचे स्वरूप 5000/- रोख, शाल, श्रीफळ व गौरव पत्र. “रमाबाई आंबेडकर महिला सामाजिक पुरस्कार” यावर्षी हा पुरस्कार पुण्याच्या ज्योती पठाणीया यांना देण्यात आला आहे. सदर पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते मल्लेश चौगुले यांच्याकडून देण्यात येतो. याचे स्वरूप 5000/- रोख शाल, श्रीफळ व गौरव पत्र असे आहे. “गुरुवर्य गावडोजी पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार” यावर्षी येळ्ळूर येथील श्री शिवाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक एम. बी. बाचीकर यांना देण्यात येणार आहे, हा पुरस्कार माजी आमदार परशुराम नंदीहळ्ळी यांच्याकडून देण्यात येतो, याचे स्वरूप 5000/- रोख, शाल, श्रीफळ व गौरवपत्र. “विशेष साहित्य पुरस्कार” हा पुरस्कार, इस्लामपूर येथील प्रा. सुनंदा शेळके यांना देण्यात येणार आहे, हा पुरस्कार बेळगावचे उद्योजक आप्पासाहेब गुरव यांच्याकडून त्यांच्या आईच्या स्मरणार्थ देण्यात येतो, याचे स्वरूप, 7000/- रुपये रोख, शाल, श्रीफळ व गौरवपत्र असे आहे. “कै. कृष्णा मुचंडी पत्रकारिता पुरस्कार” हा पुरस्कार यावर्षी दै. पुढारीचे आवृत्ती संपादक गोपाळ गावडा यांना देण्यात येणार आहे. हा पुरस्कार बेळगाव वार्ताचे संपादक सुहास हुद्दार यांच्याकडून देण्यात येतो, याचे स्वरूप, 5000/- रोख, शाल, श्रीफळ व गौरव पत्र असे आहे. तसेच यंदाचा “क्रीडा पुरस्कार” क्रिकेटपटू सुजय संजय सातेरी यांना देण्यात येणार आहे, तसेच “कृषी पुरस्कार” येळ्ळूरचे प्रगतशील शेतकरी दौलत कुगजी यांना देण्यात येणार आहे. याचे स्वरूप रोख रक्कम, शाल, श्रीफळ व गौरवपत्र असे आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *