श्रीनिकेतन स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन
निपाणी (वार्ता) : विद्यार्थ्यांमधील कलागुणांना व मिळण्यासाठी शाळास्तरावर वार्षिक स्नेहसंमेलनासह विविध क्रीडा स्पर्धा, उपक्रम राबविणे काळाची गरज आहे, असे मत डॉक्टर चंद्रकांत कुरबेट्टी यांनी व्यक्त केले. येथील श्री महावीर दिगंबर जैन बोर्डिंग ट्रस्ट संचलित श्रीनिकेतन मराठी आणि इंग्लिश माध्यम शाळा स्कूल, शांतिनिकेतन मराठी स्कूलमध्ये आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन प्रसंगी ते बोलत होते.
मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन झाले. मुख्याध्यापिका अलका भोसले यांनी स्वागत केले.
फातिमा पठाण यांनी शैक्षणिक वर्षातील कार्याचा आढावा घेतला. यावेळी समर्थ देशपांडे, स्वराली कुलकर्णी यांना आदर्श विद्यार्थी म्हणून तर जनरल चॅम्पियनशिप म्हणून संस्कार निर्मळे, सानिका भोईटे यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
संमेलनात नर्सरी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी, कन्नड या गीतावरती नृत्ये व नाटिका सादर केल्या. डॉ. सी. बी. कुरबेट्टी, डॉ. किशोर गुरव यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास चेअरमन डॉ. अनिल ससे, डॉ. किशोर गुरव, कपूरचंद इंगळे, मिलिंद चौगुले, प्रदीप पाटील, विजय लगारे, सुभाष शेट्टी, प्रा. डाॅ. अशोक डोनर, डॉ. संगीता देशपांडे, आर. डी. पाटील यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी, पालक उपस्थित होते. एम. डी. कांबळे यांनी आभार मानले.