निपाणी (वार्ता) : कोडणी रोड हद्दीनजिक देवचंद कॉलेज समोर असलेले सर्वे क्र.१८१ बी मध्ये बेकायदेशीर रित्या गाळ्याचे बांधकाम विद्युत खांब असताना केले आहे. त्याचा तेथील नागरिकासह विद्यार्थ्यांना धोका होण्याची शक्यता आहे. याबाबत योग्य ती कार्यवाही करावी, अशा मागणीचे निवेदन संभाजीनगर येथील रहिवासी पंकज गाडीवड्डर यांनी हेस्कॉम अधिकारी अक्षय चौगुले यांना सोमवारी (ता.४) दिले.
निवेदनातील माहिती अशी, देवचंद कॉलेज जवळील विद्युत खांबांमध्ये ११००० किलोव्हॅट विद्युत प्रवाह आहे. त्या गाळ्यामध्ये शाळा व कॉलेजची मुले दररोज झेरोक्स, ज्यूस पिण्यासह इतर वस्तूगोष्टी खरेदी करण्यासाठी जातात. परंतु सदर गाळा मालकांनी तेथे कोणत्याही प्रकारचे सुरक्षितेबाबत काळजी घेतलेली नाही आहे. सदर जागी प्रत्यक्ष भेट देऊन तेथील पाहणी करून सदर विद्युत खांबाची जागा हालवावी. किंवा तेथे बांधण्यात आलेल्या गाळा मालकांना रीतसर नोटीस देऊन त्यांना सदरचे गाळे तेथून काढण्यास सांगावे. अन्यथा जीवित हाणी किंवा इतर कोणतीही दुर्घटना घडल्यास घडल्यास आपले कार्यकारी मंडळ जबाबदार राहील याची नोंद घ्यावी. सदर ठिकाणी आपण त्वरित जाऊन सदर केलेल्या अर्जाची अंमलबजावणी व्हावी, अन्यथा आम्हास आपणाविरुध्य योग्य त्या कार्यालयमध्ये योग्य ती कारवाई करावी लागेल. अभियंते चौगुले यांनी निवेदन सदर जागेस भेट देऊन योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.