Sunday , July 26 2026
Breaking News

मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये विज्ञान दिनानिमित्त प्रदर्शन

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : बेळगाव मराठा मंडळ संचालक येथील मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये विज्ञान दिनानिमित्त विज्ञान वस्तू प्रदर्शन भरवण्यात आले होते. अध्यक्षस्थानी प्राचार्या स्नेहा घाटगे तर प्रमुख पाहुणे म्हणून
देवचंद कॉलेजचे प्रा. डॉ. भारत पाटील व डॉ. चंद्रकांत डावरे उपस्थित होते.
विज्ञान दिनाचे औचित्य साधून पहिले ते दहावी विद्यार्थ्यांनी बनवलेल्या वेगवेगळ्या विज्ञान प्रयोगांचे प्रदर्शन भरविले होते. याशिवाय विज्ञान आकृत्या रांगोळीमध्ये रेखाटल्या होत्या. विद्यार्थ्यांनी मनोवतातून विज्ञान दिनाचे महत्त्व सांगितले. डॉ.भरत पाटील यांनी, विज्ञानाच्या प्रगतीने जागतिक स्तरावर
आधुनिकता आली आहे. त्याचा सकारात्मक कार्यासाठी वापर करण्याचे आवाहन केले. डॉ. चंद्रकांत डावरे यांनी विज्ञानाचे दैनंदिन जीवनातील महत्व सांगितले. स्नेहा घाटगे यांनी मनोगत व्यक्त केले. स्वरा जाधव व सिमरा जमादार यांनी प्रास्ताविक केले. सई चव्हाण व मानसी कांबळे यांनी सूत्रसंचालन तर सानिया मोकाशी हिने आभार मानले. कार्यक्रमास विज्ञान शिक्षिका प्रतीक्षा वागळे, स्मिता पवार, धनश्री लोहार, जी. बी. पाटील, अजित सुलतानावर त्यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

मानकापूर शाळेच्या छतांची दुरुस्ती न केल्याने विद्यार्थी शिक्षकांची गैरसोय

Spread the love  तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली निपाणी (वार्ता) : अडीच महिन्यापूर्वी बोरगाव, मानकापूर परिसरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *