Sunday , September 20 2026
Breaking News

उदयनिधी स्टॅलिन यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारलं

Spread the love

 

सनातन धर्माची डेंग्यू-मलेरियाशी केली होती तुलना!

नवी दिल्ली : तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारलं आहे. सनातन धर्माची डेंग्यू-मलेरियाशी तुलना करून त्याच्या उच्चाटनासंदर्भात वक्तव्य करणाऱ्या स्टॅलिन यांनी यांनी यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका फेटाळताना न्यायालयाने त्यांना परखड शब्दांत सुनावलं आहे. ‘तुम्ही तुमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकाराचा गैरवापर केल्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याच्या अधिकाराचा दावा करताय?’ असा सवाल न्यायालयानं उदयनिधी स्टॅलिन यांना केला आहे.
उदयनिधी स्टॅलिन यांनी त्यांच्यावरील आरोपांना विरोध करणारी आणि कारवाईपासून संरक्षणासाठी दाद मागणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेवर आज झालेल्या सुनावणीत न्यायालयाने स्टॅलिन यांना परखड शब्दांत फटकारलं आहे. न्यायमूर्ती संजीव खन्ना व न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. या प्रकरणाची पुढील सुनावणी १५ मार्च रोजी होईल, असं न्यायालयाने यावेळी जाहीर केलं.

About Belgaum Varta

Check Also

फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; ११ कामगारांचा मृत्यू

Spread the love    कारखाना जमीनदोस्त; अनेक जण गंभीर जखमी, बचावकार्य सुरू कौशांबी (उत्तर प्रदेश) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *