सौंदलग्याचा परमकर द्वितीय; ११ जणांचा सहभाग
निपाणी (वार्ता) : येथील महादेव गल्लीतील महादेव मंदिर देवस्थान ट्रस्टतर्फे महाशिवरात्रीनिमित्त मंगळवारी (ता. ५) सायंकाळी आयोजित १४ किलोमीटर अंतराच्या मॅरेथॉन स्पर्धेत चंदगडच्या विवेक मोरे याने १ तास ५ मिनिटात अंतर पार करून प्रथम क्रमांकाचे २१ हजारांचे बक्षीस मिळविले.
स्पर्धेत सौंदर्याच्या प्रथमेश परमकर याने १ तास ६ मिनिटात अंतर कापून द्वितीय क्रमांकाचे १५ हजार रुपयाचे बक्षीस पटकावले. राधानगरीच्या प्रधान करोळकर याने १ तास ९ मिनिटात अंतर पार करून तृतीय क्रमांकाचे ९ हजारांचे बक्षीस मिळविले. गडहिंग्लजच्या कुणाल वाघ यांने १ तास १२ मिनिटात अंतर कापून चतुर्थ क्रमांकाचे ७ हजारांचे तर हुबळी येथील मृत्यूराज एस.एच. याने १ तास १३ मिनिटात अंतर पूर्ण करून पाचव्या क्रमांकाचे ५ हजारांचे बक्षीस मिळविले. याशिवाय स्पर्धेतील सर्व स्पर्धकांना बक्षीस देण्यात आली.
परीक्षक म्हणून के. एस. पाटील, वाय. बी. हंडी, एस. एल. पाटील, जी.एम. कमते, एस. एम. देसाई, बाबुराव भोपळे, प्रवीण माने यांच्यासह रेशन संस्थेच्या शिक्षकांनी यांनी काम पाहिले.
प्रारंभी अभियंते राजेश पाटील, अमोल चंद्रकुडे व मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. विजेत्यांना सदानंद चंद्रकुडे, महेश बागेवाडी, महाशिवरात्री महोत्सव कमिटीचे अध्यक्ष, माजी उपनगराध्यक्ष सुनील पाटील, उद्योजक रवींद्र शेट्टी, डॉ. महेश ऐनापुरे, रवींद्र कोठीवाले, संजय मोळवाडे, विनायक पाटील, सदाशिव चंद्रकुडे, राकेश पाटील, अभियंते गजानन वसेदार, शिवानंद पुराणिकमठ, सदाशिव चंद्रकुडे, राकेश पाटील, गजानन वसेदार व मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे दिली.
यावेळी अरुण भोसले, महादेव पाटील, ऍड. महेश दिवाण, विनोद पाटील, रोहित पाटील, बाळकृष्ण वसेदार, निखल चंद्रकुडे, चंद्रकांत चौगुले, माजी नगरसेवक रवींद्र चंद्रकुडे, बाबासाहेब साजन्नावर यांच्यासह महादेव मंदिर यात्रा कमिटी, गणेश हेल्थ क्लब, महादेव पालखी उत्सव मंडळ, महाशिवरात्री उत्सव कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
—————————————————————-
बुधवारी घोडागाडी शर्यती महाशिवरात्री
उत्सवानिमित्त बुधवारी (ता. १३) दुपारी ४ वाजता घोडागाडी शर्यतीचे आयोजन केले आहे. सामान्य घोडागाडी शर्यतीसाठी अनुक्रमे ११ हजार, ७००० हजार, ५ हजार रुपयांची बक्षिसे आहेत. नवतर घोडागाडी शर्यतीसाठी अनुक्रमे ७ हजार, ५ हजार, ३ हजार रुपये, एक्क घोडागाडी शर्यतीसाठी ५ हजार, ३ हजार, २ हजार रुपये, कासरा हातात धरून बैल पळविण्याच्या शर्यतीसाठी अनुक्रमे ३ हजार, २ हजार व १ हजार रुपयांची बक्षिसे आहेत.