Monday , December 8 2025
Breaking News

गॅरंटी योजनेमुळे काँग्रेसने इतिहास रचला

Spread the love

 

पालकमंत्री सतीश जारकिहोळी; निपाणीत मेळावा

निपाणी (वार्ता) : विधानसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेस सरकारने गॅरंटीच्या जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. सरकार सत्तेवर येताच मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी पहिल्याच बैठकीत आश्वासनांची पूर्तता केली आहे. त्यामुळे महिलासह कुटुंबाचे सबलीकरण होत आहे. त्यामुळे नागरिकांनी काँग्रेसच्या पाठीशी राहावे, असे आवाहन पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी केले. निपाणी तालुका पंचायत आणि नगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने राजा शिवछत्रपती सांस्कृतिक भवनात आयोजित गॅरंटी मेळाव्यात ते बोलत होते.
जारकीहोळी म्हणाले, गॅरंटी योजना अमलात आणून काँग्रेसने इतिहास रचला आहे. सिद्धरामय्या सरकार आणखीन नवीन योजना राबविण्यात येणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावणार असल्याचे सांगितले.
माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी, निवडणूक काळात दिलेल्या गॅरंटीबाबत टीका केली होती. पण काँग्रेसने मोफत वीज, बस प्रवास, धान्य पुरवठा, गृहलक्ष्मी, युवा निधी अशा योजनांची पूर्तता केली आहे. आता याच योजनांची भाजपने कॉपी करत असल्याचे सांगितले. वीरकुमार पाटील यांनी, या पुढील काळातही सर्वसामान्यांसाठी सरकार योजना राबवणार आहेत. त्यामुळे आगामी निवडणूकीत धडा शिकवण्याचे आवाहन केले.
चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांनी, काँग्रेसने गरिबांचे हीत जोपासण्याचा प्रयत्न केला आहे. मोदी सरकारला आता काँग्रेसचे भीती वाटू लागली आहे. भाजपाच्या अफवांना बळी न पडण्याचे आवाहन केले. जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सुप्रिया पाटील, सुमित्रा उगळे यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास चिक्कोडीच्या उपविभागीय अधिकारी मेहबुबबी, अण्णासाहेब हवले, राजेश कदम, रोहन साळवे, पंकज पाटील, राजेंद्र वड्डर, सुजय पाटील, नको पाटील, गटशिक्षणाधिकारी महादेवी नाईक, बसवराज पाटील, चंद्रकांत जासूद यांच्यासह निपाणी मतदारसंघातील लाभार्थी व कार्यकर्ते उपस्थित होते. तहसीलदार मुजफ्फर बळीगार यांनी स्वागत केले. सुनील मत्तीन यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

इचलकरंजी येथील युवकाचा निपाणी जवळ खून

Spread the love  धारदार शस्त्राचा वापर ; मृतदेह टाकला ओढ्यात निपाणी (वार्ता) : इचलकरंजी येथील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *