दृष्ट प्रवृत्तीच्या प्रतिकृतीचे दहन
निपाणी (वार्ता) : शहरासह उपनगरात रविवारी (ता.२४) सायंकाळी होळी पौर्णिमा साजरी झाली. त्यानिमित्त चौकाचौकासह घरासमोर होळ्या पेटवून पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला. सोमवारी (ता. २५) सकाळी होळीच्या राखेतून बालचमूंनी धुळवड साजरी केली. काही युवक मंडळांनी परिसरातील कचरा गोळा करून पर्यावरणपूरक होळी साजरी केली. धुळवडीच्या पार्श्वभूमीवर महामार्ग, सेवारस्ते व शहरात पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता.
साखरवाडीतील युवक मंडळाने हनुमान मंदिरासमोर होळी साजरी झाली. यावेळी शिरीष कमते, अण्णासाहेब साळुंखे, सुरेश बोरगावे, सचिन पोवार, शिवाजी साळुंखे, राजू निकम, अतुल चावरेकर, विजय ऱ्हाटवळ यांच्यासह महिला उपस्थित होत्या.
साखरवाडीतील हौसाबाई कॉलनी परिसरातील युवकांनी सायंकाळी परिसराची स्वच्छता करून कचऱ्याची होळी केली.
उमा आवळेकर, सरस्वती नावलगी, माया जाधव, रूपाली जाधव व परिसरातील ज्येष्ठ महिलांच्या हस्ते होळीची पूजा झाली. यावेळी अश्विन आवळेकर, सौरभ लोहार, प्रसाद माने, धनंजय पुंडे, अशोक राऊत, विक्रम जाधव, हर्षवर्धन जाधव, श्रवण जाधव, अमित कामत, उत्तम लोहार, रोहन राऊत उपस्थित होते.
बसवाननगरातील शिवप्रेमी बाल व युवक मंडळातर्फे होळीमध्ये दृष्ट प्रवृतीच्या प्रतिकृतीचे दहन केले. यावेळी मयुरेश आवळेकर, निखिल चौगुले, मयुर खोत, साई बागे, सिद्धार्थ जाधव, विघ्नेश बल्लोळे, प्रथमेश लोहार, साई वाघे, आदित्य लोहार, विराज आवळेकर, उन्मेश काटकर, प्रसन्न देवडकर, प्रज्वल कस्तुरे, सुजल बाबर यांच्यासह कायर्कते उपस्थित होते.
प्रगती नगरातील प्रगतीनगर मित्र मंडळातर्फे आयोजित होळीचे पूजन चंद्रकांत हिरेमठ यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रवीण येजरे, बाबुराव मलाबादे, बाळासाहेब शेडगे, विनोद साळुंखे, महारुद्र बेडगे, अवधूत शेडगे, अमित बल्लारी, प्रथमेश शेडगे, देवेंद्र खोत, आशिष सांगावकर, निलेश पठाडे, विवेक पाटील, विवेक सूर्यवंशी, विकी बल्लारी यांच्यासह महिला उपस्थित होत्या.