Monday , December 8 2025
Breaking News

कोगनोळीत भरदिवसा घरफोडी; रोख रक्कम सोने लंपास

Spread the love
नागरिकात भीती
कोगनोळी : गावापासून जवळच असणाऱ्या मल्लेवाडी माळ येथे भर दिवसा घर फोडून रोख रक्कम व सोने लंपास केल्याची घटना शुक्रवार तारीख 12 रोजी दुपारी 1 वाजता उघडकीस आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, कोगनोळी पैकी मल्लेवाडी माळावर येथील माळी गल्लीतील सुभाष दादू माळी यांनी घर बांधले आहे. नेहमीप्रमाणे सुभाष माळी व पत्नी वनिता माळी, मुलगी पुनम घरातील कामे आटपून घराला कुलूप लावून शेतात कामासाठी गेले. घरात कोणी नसल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी घराचा समोरील दरवाजा मोडून घरात प्रवेश केला. दुसऱ्या खोलीमध्ये प्रवेश करण्यासाठी खोलीचा दरवाजा मोडून प्रवेश करून खुलीत असणारी तिजोरी उघडी करून त्यातील रोख रक्कम 35 हजार व सोने दीड तोळा व चांदीचे दागिने असे एकूण सुमारे एक लाख रुपयाचा मुद्देमाल पळवून नेला.
सुभाष माळी शेतातील काम संपवून घरी आले असता घरात चोरी झाल्याचे त्यांना निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ आरडाओरडा केला. शेजारी शेतात काम करणारे लोक व शेजारीपाजारी जमा झाले. तात्काळ निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनशी संपर्क साधून घडलेल्या घटनेची माहिती देण्यात आली. घटनास्थळी कोगनोळी बीट हवलदार शिवप्रसाद कीवडणावर यांनी भेट देऊन पाहणी केली.
कोगनोळी परिसरामध्ये गेल्या चार आठ दिवसांमध्ये मंगळसूत्र हसडा मारून पळविणे, चेन हासडा मारून पळवणे या घटना ताज्या असतानाच घरफोडी झाल्याने नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे.

About Belgaum Varta

Check Also

बोरगाव पट्टणपंचायतीच्या निधीतून आयको परिसरात पाणी योजनेचे उद्घाटन

Spread the love  निपाणी (वार्ता) : बोरगाव उपनगर असलेल्या आयको येथील मल्लिकार्जुन नगरमधील नागरिकांना अनेक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *