निपाणी (वार्ता) : बेनाडी येथील रेणुका मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे. त्यासाठी धर्मस्थळ अभिवृद्धी संघातर्फे मंदिराच्या उभारणीसाठी एक लाखाचा धनादेश देण्यात आला. तर युवा उद्योजक महादेव पाटील-पुणेकर यांनी ७० हजाराची देणगी दिली.
रेणुका मंदिर कमिटीचे अध्यक्ष सातगोंडा जनवाडे यांनी स्वागत केले. यावेळी धर्मस्थळ ग्रामीण अभिवृद्धी मंडळाच्या अधिकाऱ्यासह उद्योजक पाटील यांचा सत्कार करण्यात आला. उपाध्यक्ष बाळासाहेब देशिंगे यांनी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी भाविकांनी मदत करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमास सेक्रेटरी राजेंद्र फतरे, अण्णासाहेब घाटवडे, शिवगोंडा पाटील, रायगोंडा पाटील, सदाशिव जनवाडे, सुनील शहा, राम जोशी, सुनील जनवाडे, शिवाजी परीट, धर्मस्थळ अभिवृद्धी योजनेचे मंजुनाथ, शांताबाई परीट, जयश्री शेवाळे, सिंधुबाई गोरे, गौराबाई परीट, केरूबाई शेवाळे यांच्यासह कमिटीचे सदस्य व भाविक उपस्थित होते.