निपाणी (वार्ता) : येथील साखरवाडीतील साळवे परिवार अनेक दशकांपासून काँग्रेस पक्षाचे काम करीत आहे. या कामाचा विचार करून युवा उद्योजक रोहन साळवे यांची चिक्कोडी जिल्हा काँग्रेस पक्षाच्या उपाध्यक्षपदी निवड केल्याचे पत्र सार्वजनिक बांधकाम व बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी साळवे यांना दिले.
पक्षश्रेष्ठींच्या सूचनेनुसार ही निवड करण्यात आली आहे.
रोहन साळवे यांनी १ मे पासून पदभार स्वीकारला. माजी ऊर्जामंत्री वीरकुमार पाटील, माजी आमदार काकासाहेब पाटील, बुडाचे अध्यक्ष व चिक्कोडी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांच्या सहकार्याने ही निवड करण्यात आली आहे.
काँग्रेस पक्षाच्या नेते मंडळींच्या मार्गदर्शनाखाली मार्गदर्शनाली चिक्कोडी जिल्ह्यात काँग्रेस पक्ष वाढीसह पक्षाच्या बळकटीसाठी करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. त्यांच्या विश्वासाला पात्र राहून सरकारच्या योजना सर्वसामान्यापर्यंत पोहोचण्यासाठी कार्यरत राहणार असल्याचे रोहन साळवे यांनी सांगितले. यावेळी माजी मंत्री वीकुमार पाटील, माजी आमदार काकासाहेब पाटील, राहुल जारकीहोळी, निपाणी भाग काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, जिल्हा पंचायतीचे माजी उपाध्यक्ष पंकज पाटील, माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वड्डर, सुजय पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
🙏 देश बांधवो ।
मला सतत भेडसावणार प्रश्न म्हणजे ,जर शाशनाच्या सर्व योजना, रस्त्यावरील बेबस गरिबांसाठी आहेत तर ती गरिबी ,जीवनाच्या प्राथमिक गरजांसाठी जीवनाच्या आक्रांतांने टाहो फोडतांना रस्त्यावरील दिसता कामा नये ।
🙏 देश बांधवो ।
मला सतत भेडसावणार प्रश्न म्हणजे ,जर शाशनाच्या सर्व योजना, रस्त्यावरील बेबस गरिबांसाठी आहेत तर ती गरिबी ,जीवनाच्या प्राथमिक गरजांसाठी जीवाच्या आक्रांतांने टाहो फोडतांना रस्त्यावरील दिसता कामा नये ।