निपाणी (वार्ता) : येथील आश्रय नगर, शिवाजीनगरात चिकोडी लोकसभेच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रियांका जारकिहोळी यांच्या प्रचारार्थ कॉर्नर सभा पार पडल्या.
यावेळी म्हैसूरचे आमदार रविशंकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शीख समुदायतील ६० हुन अधिक कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
माजी आमदार काकासाहेब पाटील, माजी मंत्री विरकुमार पाटील, चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
सभांना नगराध्यक्ष प्रवीण भाटले, टाऊन प्लॅनिंग अध्यक्ष निकु पाटील, कविता थोरवत, नगरसेविका लक्ष्मी बल्लारी, मंगल घोरपडे, विशाल भाटले, रमेश भोईटे, विनोद बल्लारी, विकास शिंदे, सुरेश कोळी, गणेश झेंडे, विजय घोसावी, सुभाष पाटील, समीर सय्यद, राजू पाटील, बबन गोसावी, दीपाली श्रीखंडे यांच्यासह महिला, युवक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta