Tuesday , March 3 2026
Breaking News

शिवसेनेचा काँग्रेसला पाठिंबा : बाबासाहेब खांबे यांची माहिती

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : महाराष्ट्रातील महाविकास आघाडी प्रमाणेच सीमा भागामध्ये निपाणी शिवसेना सीमाप्रश्नाची बांधीलकी जपत काँग्रेसच्या उमेदवार प्रियांका सतीश जारकीहोळी यांना बिनशर्त पाठींबा देत असल्याची माहिती बेळगाव जिल्हा शिवसेनाप्रमुख बाबासाहेब खांबे यांनी दिली.
खांबे म्हणाले, शिवसेना वरिष्ठांच्या आदेशानुसार निपाणी शिवसेना काँग्रेसच्या उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांना पाठिंबा देत आहे. निपाणी सीमाभागामध्ये जारकीहोळी यांचे सहकार्याने केंद्रातील निधीचा वापर करून परिसराचा विकास व्हावा. कोल्हापूर सीपीआर सारख्या अद्यावत आरोग्य सेवेसाठी दवाखाना व्हावा. निपाणी भागामध्ये अनेक बेरोजगार आहेत. त्यांना रोजगार मिळण्यासाठी या ठिकाणी मोठी औद्योगीक वसाहत करावी. निपाणीमध्ये पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. तो सोडवावा. सीमाप्रश्नाची सोडवणूक करून मराठी भाषिकांचा आदर रहावा. मराठी माणसाची अस्मिता राखण्यासाठी जारकीहोळी यांना पाठींबा देत असल्याचे खांबे यांनी सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

निपाणी अक्कोळ रोडवर ‘बर्निंग’ व्हॅनचा थरार

Spread the love  नागरिकांच्या सतर्कतेमुळे वाचले चालकाचे प्राण निपाणी (वार्ता) : भरधाव जाणाऱ्या मारुती व्हॅनने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *