बेळगाव : निपाणी तालुक्यातील रासाई शेंडूर येथील रहिवासी भरत कृष्णा ढोकारे यांचे काल रात्री झालेल्या वादळी पावसामुळे राहत्या घराची भिंत कोसळून आर्थिक नुकसान झाले आहे. ढोकारे कुटुंबियांचे राहते घर कोसळल्यामुळे जीवनोपयोगी वस्तूंचे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही. बऱ्याच ठिकाणी जुन्या घरांची पडझड सुरू आहे. प्रशासनाने याची दखल घेऊन ढोकारे कुटुंबियांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta