Sunday , July 26 2026
Breaking News

शहापूरात दोन गटात हाणामारी; तणावाचे वातावरण

Spread the love

 

 

बेळगाव : बेळगाव शहरातील शहापूर येथील आळवण गल्ली येथे लहान मुलांच्या भांडणाचे रूपांतर हाणामारीत आणि दगडफेकीत झाले असून आज सायंकाळी सदर घटना घडली आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, लहान मुले क्रिकेट खेळत असताना किरकोळ भांडण झाले त्याचे रूपांतर हाणामारीत झाले नंतर परिसरात दगडफेक झाली. या घटनेत दोन जण जखमी झाले आहेत. सदर घटनेची माहिती शहापूर पोलिसांना मिळताच शहर पोलीस आयुक्तांसह अन्य पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. आळवण गल्लीत कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून या घटनेत गंभीर जखमी झालेल्या दोघांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहेत. या भांडणाचे नेमके कारण अद्याप समजले नसून शहापूर पोलीस पुढील तपास करीत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *