निपाणीत शुभेच्छांचा वर्षाव
निपाणी (वार्ता) : चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातील निपाणी विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी आपल्यावर विश्वास ठेवून लोकसभेमध्ये पाठवले आहे. त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी निपाणी मतदारसंघाचा विकासाच्या माध्यमातून कायापालट करण्यासाठी प्रयत्नशील आहे, अशी ग्वाही नूतन खासदार प्रियांका जारकीहोळी यांनी दिली. खासदारपदी निवड झाल्यानंतर प्रियांका जारकी होळी यांनी पहिल्यांदाच निपाणी मतदारसंघात गुरुवारी (ता.६) भेट दिली. साखरवाडीतील साळवे-कदम यांच्या घरी भेट देऊन काँग्रेस नेते मंडळी, कार्यकर्ते व मतदारांचे आभार मानले. त्यावेळी त्या बोलत होत्या.
जारकीहोळी म्हणाल्या, निपाणी मतदारसंघात सर्वाधिक मताधिक्य मिळाले आहे. हे कधीही विसरणार नाही. मतदार संघात माजी आमदार काकासाहेब पाटील, माजी मंत्री वीरकुमार पाटील, प्रा. सुभाष जोशी, चिक्कोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, सहकाऱत्न उत्तम पाटील, जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष रोहन साळवे, निपाणी भाग काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली विकासकामे करणार असल्याचे सांगितले.
ज्योती कदम, संगीता कदम, सुप्रिया पाटील,सुमित्रा उगळे यांनी प्रियांका जारकीहोळी यांचे औक्षण केले. माजी आमदार काकासाहेब पाटील, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष रोहन साळवे, निपाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, टाऊन प्लॅनिंग कमिटी अध्यक्ष निकु पाटील, सुजय पाटील यांच्या हस्ते खासदार जारकीहोळी यांचा सत्कार झाला.
यावेळी माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वड्डर, हालशुगरचे माजी अध्यक्ष सुकुमार पाटील- बुदीहाळकर, रवींद्र कदम, बेडकीहाळ भाग काँग्रेस अध्यक्ष बसवराज पाटील, माजी नगराध्यक्ष चंद्रकांत जासूद, विजय शेटके, पप्पू चव्हाण, किरण कोकरे, अल्लाबक्ष बागवान, नगरसेवक अरुण आवळेकर, ॲड. संजय चव्हाण, रफिक गवंडी, रवी श्रीखंडे, लक्ष्मी बल्लारी, संदीप चावरेकर, महिला भाग काँग्रेस अध्यक्षा वर्षा चव्हाण, योगिता कांबळे, वैशाली खोत यांच्यासह शहर आणि परिसरातील काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta